रायगड मित्र परिवार युवा माहेश्वरी आयोजित रक्तदान शिबीरात 52 जणांचे रक्तदान
अहमदपुर (गोविंद काळे) : अहमदपूर शहरात नवीन वर्षाच्या सुरुवातीला दिनांक 01/01/2023 रोजी श्री चुडामणी महाराज मंदीर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदरील कार्यक्रमाची सुरुवात श्री संत चुडामणी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व आरती करून करण्यात आले .या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सेवानिवृत्त मुख्याध्यापक देवेंन्द्र देवनीकर सर तर उदघाटक म्हणून माजी मंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष विनायकराव पाटील हे होते. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार बब्रूवानजी खंदाडे ,डॉ . पांडुरंग कदम, सुरेशराव फुलारी, माधवराव हेंगने ,श्रीकांत भुतडा , भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंदराव गिरी, नरहरी माळी, उमाकांत कासनाळे, रामभाऊ बेल्लाळे, हे उपस्थित होते. यावेळी संगमेश्वरजी नीला ,चंद्रशेखर डांगे, सुरेश डबीर, चंदकांत शिंदे, अनिल फुलारी, कमलाकर नळेगावकर, प्रवीण शिरूरे, अंजाया सेठ, राजु भाऊ कंधारकर, भरत इगे , किरण हिवरे, दत्ता डांगे, लक्ष्मण अलगुले, राजु जाधव, अँड. किशोर कोरे, छोटु अय्या, हे होते तर या कार्यक्रमात नूतन लोकनियुक्त सरपंच लक्ष्मण खंदाडे ,रामभाऊ चिगळे, शंकर मुळे पाटील, वैभव बेंबळकर, सौ. दैवशाला मुरलीधर पाटील यांचा सत्कार माजी मंत्री विनायकराव पाटील व माजी आमदार बब्रुवान खंदाडे यांच्या हस्ते करण्यात आला.
या कर्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष सहकार्य मकरंद जोशी सर, संतोष कदम, दयानंद मद्देवार ,हरिभाऊ गोखरे , बापुराव गोखरे, गणेश सूर्यवंशी, दयानंद घाटोळ, दिपक हालसे, अनिकेत काशिकर, गणेश सुर्यवंशी, सुरेश सोनी, हरीश नाईकवाडे, निलेश बाहेती, किरण कदम, दत्ता पाचंगे, प्रमोद शिंदे, राम जाधव, सुदर्शन हालसे, सुभाष हालसे माऊली हालसे, सुनील हालसे, ऋषी बोडगेमोहीत वारे यांनी अथक परिश्रम केले तर विलासराव देशमुख शासकीय रक्तपेढी लातूर येथून आलेले सर्व डॉक्टर व स्टाफ यांचा संयोजन समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी 52 रक्तदात्यानी रक्तदान करून खूप मोठी सामाजिक बांधिलकी जोपासली याबद्दल रायगड मित्र परिवार व युवा माहेश्वरी परीवाच्या वतीने आभार मानण्यात आले. तसेच सदरील रक्तदान कार्यक्रम उत्तम नियोजनात यशस्वी केल्याबद्दल युवा माहेश्वरी चे प्रतिनिधी विनोदजी भुतडा व रायगड मित्र परिवाराचे प्रतिनिधी गणेश हालसे सर ,यांचा विलासराव देशमुख रतपेढीच्या वतीने सन्मान करण्यात आला.
