संत ज्ञानेश्वर विद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील संत ज्ञानेश्वर विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त शाळेत वेशभूषा ,वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचे वर्णन केले. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून भाषण स्पर्धेला प्रारंभ करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त मुख्याध्यापक गोविंदराव गौंड, उद्धव शृंगारे, लिनेस क्लबच्या अध्यक्षा मीना तोवर सह माता पालक उपस्थित होते. यावेळी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी भाषणामध्ये सहभागी होत आपले विचार मांडले. या भाषण स्पर्धेत सर्वप्रथम स्वरा गौंड, द्वितीय ओजस कुलकर्णी, व तृतीय सानवी पांचाळ, वेशभूषा स्पर्धेत प्रथम ज्ञानेश्वरी सूर्यवंशी, द्वितीय सानवी पांचाळ आणि तृतीय श्रावणी कावर भाषाण स्पर्धेत व वेशभूषा स्पर्धेत प्रथम द्वितीय तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यास मुख्याध्यापिका आशा रोडगे यांच्या हस्ते बक्षीस देऊन कौतुक करण्यात आले. या स्पर्धेचे निरीक्षक म्हणून संगीता आबंदे, अर्चना जांभळदरे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका आशा रोडगे यांनी केले तर सूत्रसंचालन सतीश साबणे यांनी व आभार मीना तोवर यांनी मांनले.
