शिरूर ताजबंद ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी सुरज बाबासाहेब पाटील यांची एक मताने निवड !

शिरूर ताजबंद ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी सुरज बाबासाहेब पाटील यांची एक मताने निवड !

अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील बहुचर्चित असलेल्या सर्वात मोठ्या ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी सुरज बाबासाहेब पाटील यांची एक मताने निवड झाली. या निवडीनंतर त्यांचा सत्कार करून जल्लोष साजरा करण्यात आला. शिरूर ताजबंद चे नवनिर्वाचित सरपंच मच्छिंद्र भिवाजी वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंचाच्या निवडीसाठी नूतन सदस्याची बैठक झाली. यावेळी सुरज बाबासाहेब पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. एकमेव अर्ज असल्याने माजी सरपंच साहेबराव जाधव, सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता सुभाष पाटील, जिल्हा परिषदेचे माजी गटनेते मंचकराव पाटील, व्हाईस चेअरमन सुभाष गुंडरे, माजी पंचायत समिती सदस्या सुशीला भातिकरे, माजी सरपंच सावित्रा पडोळे, माजी प्राचार्य आर एन वलसे, रामप्रसाद जाजू यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक निर्णय अधिकारी डी.व्ही.सूळ यांच्या उपस्थितीत प्रगती पॅनलचे सुरज बाबासाहेब पाटील यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाली. या निवडीनंतर उपसरपंचासह सदस्यांचा सत्कार करण्यात आला.

माजी राज्यमंत्री बाळासाहेबजी जाधव, अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. प्रसंगी प्रमुख उपस्थिती माजी सभापती शिवानंद तात्या हेंगने, कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता सुभाषराव पाटील, माजी सरपंच सौ.सावित्रीताई कोंडीबा पडोळे, माजी सरपंच साहेबराव जाधव, जिल्हा परिषद गटनेते मंचकराव पाटील, तालुकाध्यक्ष शिवाजीराव देशमुख, माजी सभापती शिवाजीराव खांडेकर, दीपकराव भराटे सर, प्रशांत पाटील, प्रा. द.मा.माने सर, माजी सरपंच बालाजीराव बैकरे, चेअरमन तुळशीराम भोसले, व्हाईस चेअरमन सुभाषराव गुंडरे, माजी चेअरमन दिलीपराव वलसे, माजी व्हाईस चेअरमन गोविंदराव कापसे, अविनाश देशमुख, प्रेमचंद दुर्गे, श्याम देवकते, रमाकांत भातिकरे, कोंडीबा पडोळे सर, मा.प्राचार्य आर.एन वलसे, शिवचंद्र गुरुमे, मौलासाब शेख, विश्वनाथ आप्पाभूरे, रामप्रसाद जाजू, ज्ञानोबा डोंगरे, माधव सरवदे, अमित नवणगावे, शिवसांब स्वामी, शिवाप्पा स्वामी, शार्दुल शेख, इलियास सय्यद, फेरोज शेख, भीमाशंकर येनुरे, बी.जी. पडोळे, बबलू सौदागर, बालाजी गुंडरे, विजयकुमार येलमंटे, विवेक वलसे, राजू चव्हाण, संतोष पवार, दिगंबर फुलमंटे, अनिल लामतुरे, मुख्तार शेख, उद्धवराव भोसले, हनुमंत बडगिरे, राहुल तेलघाने, सलीम शेख,हुसेन मणियार, अशोक सोनकांबळे, कपिल स्वामी, लक्ष्मण येलमंटे, विश्वनाथ जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!