कांस्यपदक विजेता आदित्य भरडे या खेळूडाचा आ. बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते सत्कार
अहमदपूर (गोविंद काळे) : बोकरा स्टील सिटी (झारखंड ) येथे 27 ते 30 डिसेंबर रोजी पार पडलेल्या अहमदपूर तालुक्यातील महात्मा गांधी महाविद्यालय येथील विध्यार्थी मौजे मालेगाव येथील खेळाडू आदित्य चंद्रकांत भरडे यांची राष्ट्रीय किशोर गट स्पर्धेत महाराष्ट्र राज्यात कांस्यपदक सब जुनिअर स्पर्धेत मिळाल्या बद्दल अहमदपूर -चाकर मतदार संघाचे आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. महाराष्ट्र राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचा कबड्डी संघ कास्यपादक त्रतीय क्रमांक पटकवला हे आपल्या मतदारसंघातील अभिमानाची बाब आहे. यावेळी खेळाडूंचे माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव , श्रीरंग बंडापल्ले,प्रा. गणपतराव माने, धर्मपाल गायकवाड,शंकर बुड्डे, शरद माने, भास्कर माने, मनोज रेड्डी,सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता सुभाषराव पाटील,माजी प्राचार्य आर इन वलसे सर, यांनी अभिनंदन केले.
