परचंडा ग्रामपंचायततीस ‘स्मार्ट ग्राम’ पुरस्कार जाहीर
परचंडा (गोविंद काळे) : आर. आर (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कारासाठी तालुक्यातील परचंडा ग्रामपंचायतची निवड जिल्हा परिषद लातूर कडून निवड जाहीर करण्यात आली. असून या परचंडा गावला शासनाचा ‘स्मार्ट ग्राम पुरस्कार ‘नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशीच जाहीर झाल्याने ग्रामस्थातून व तालुक्यातुन आनंद व्यक्त केला जात आहे. परचंडा ग्रामपंचायतीने स्वच्छता, नारळ झाडे लागवड, स्वच्छालय निर्मिती, जिल्हा परिषद शाळा डिजिटल, अंगणवाडी, रस्ते सांडपाणी व्यवस्थापन, पेव्हर ब्लॉक काम, कोरोना काळातील कार्य, पाणी व्यवस्थापन अशा अनेक आघाड्यावर पर्यावरण गावचे सौंदर्य, आरोग्य, शिक्षण गावच्या दृष्टीने ठळक कामे केल्याने जिल्हा परिषदेने परचंडा ग्रामपंचायतला स्मार्ट व्हिलेज म्हणून तालुक्यातून निवड केली आहे. गावचे सरपंच शिवनंदा राजेंद्र हिप्परगे, ग्रामसेवक व्यंकट. व्ही. येलगत्ते उपसरपंच सौ कुशावर्ता भागवत कदम तसेच ग्रा.प.सदस्य व समस्त गावकरी मंडळी यांच्या सहकार्याने गटविकास अधिकारी अमोल कुमार आंदेलवार, विस्तार अधिकारी श्री केंद्रे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गावात स्वछता वृक्षारोपणासह अनेक लोकोपयोगी उपक्रम राबविण्यात आले. याबद्दल गावातील लोकांच्या मनामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आहे त्यामुळे गावात हळूहळू बदल होण्यास सुरुवात झाली आहे यामुळे तालुक्यात स्मार्ट ग्राम म्हणून सदस्यांनी परचंडा गावची निवड झाली आहे. स्मार्ट ग्राम म्हणून निवड झालेल्या ग्रामपंचायतिला दहा लाख रुपये बक्षीसतर्फे दिले जाते. परचंडा गावच्या विकास कामात भर पडणार आहे. या आलेल्या बक्षीसातून गावातील विकास कामे करावी लागतात. परचंडा गावचे सरपंच एक उपक्रमशील विकास कामे खेचून आणणारा व अभ्यासू असल्याने गावातील नागरिक समाधान व्यक्त करत आहे. परचंडा गावला स्मार्ट ग्राम पुरस्कार मिळाल्यानेची जबाबदारी आणखी वाढली असून अशाच पद्धतीने यापुढेही आपल्या सर्वांनी आपली गाव सुंदर, स्वच्छ, सुशोभित ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा. असे आवाहन ग्रामसेवक येलगत्ते यांनी सरपंच सौ शिवनंदा राजेंद्र हिप्परगे व उपसरपंच सौ.कुशावर्ता भागवत कदम व अन्य ग्रा. प .सदस्यांनी केला आहे.
