बालाघाट एज्युकेशन कॅम्पस च्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी
अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील बालाघाट तंत्रनिकेतन तथा औद्योगिक प्रशिक्षण संस्था व सम्राट चंद्रगुप्त मोरे इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त संस्थेच्या संचालिका शिवालिकाताई हाके यांच्या शुभहस्ते प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली. यावेळी बोलताना ३ जानेवारी हा सावित्रीबाईंचा जन्मदिवस संपूर्ण महाराष्ट्रात बालिका दिन व महिला मुक्तीदिन म्हणून साजरा केला जातो. बी.आर.आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे यांच्या सोबतच फुले या मागासवर्गीयांसाठी एक आयकॉन बनल्या आहेत. असे मत शिवालीकताईने मांडले.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य मदन आरदवाड,प्राचार्य रुत चक्रनारायण, संतोष लातूरे ,सतीश केंद्रे,रूपा पाटील,गणेश यामगिर,आनंद लोहकरे,विजय पांचाळ,आदी उपस्थित राहून अभिवादन केले.
