यशवंत विद्यालयात सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी

यशवंत विद्यालयात सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील यशवंत विद्यालयामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती विविध कार्यक्रमाने अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये संपन्न झाली. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य व्ही व्ही गंपले व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून पर्यवेक्षक उमाकांत नरडेले, एन सी सी ऑफिसर अशोक पेदेवाड, राम तत्तापुरे, अरुण मोरे, विभाग प्रमुख राजकुमार पाटील, प्रमुख मार्गदर्शिका मधुबाला आंधळे शरद करकनाळे सह मान्यवरांची उपस्थिती होती. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून भाषण स्पर्धेला आरंभ करण्यात आला. यावेळी विविध मुला, मुलांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन चरित्रावर मार्गदर्शन केले.

यावेळी मधुबाला आंधळे आणि प्राचार्य व्ही व्ही गंपले यांचे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारी भाषणे झाली. या भाषण स्पर्धेत सर्वप्रथम सृष्टी गणेश बेरळकर द्वितीय निसर्ग जगन्नाथ चाटे तर सर्व तृतीय विद्या हरिराम गुट्टे आणि आसमा शादुल बागवान यांना विभागून पारितोषक देण्यात आले. या स्पर्धेचे निरीक्षक म्हणून सहशिक्षक राम तत्तापूरे, विश्वरूप धाराशिवे, राजकुमार बोराळकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धी गणाचार्य यांनी तर आभार शरद करकनाळे यांनी मानले. या विजेत्यांचा सत्कार प्राचार्य यांच्या हस्ते करण्यात आला.

About The Author

error: Content is protected !!