प्रत्येक प्रभागात फलकच नव्हे तर, प्रत्येक बुथवर वीस कार्यकर्ते तयार करा – अड. गुलाब पटवारी
उदगीर (एल. पी. उगीले) : लातूर जिल्ह्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या रूपाने रंगीत तालीम म्हणून “बाळासाहेबांची शिवसेना” सर्वात पुढे राहील. या दृष्टीने सर्व शिवसैनिकांनी सक्रिय राहून कार्य करावे. प्रत्येक प्रभागात बाळासाहेबांची शिवसेना असे फलक लावून त्या फलकावर सर्व कार्यकर्त्यांची नावे व संपर्क क्रमांक लिहून ठेवावा. जेणेकरून शासनाच्या विविध लोक कल्याणकारी योजना लोकांपर्यंत पोहोचणारी एक यंत्रणा म्हणून शिवसेना काम करणार आहे, असे विचार ज्येष्ठविधीज्ञ तथा शिवसेना जिल्हा संघटक गुलाब पटवारी यांनी व्यक्त केले. ते उदगीर शहरातील शेतकी निवास भागामध्ये “बाळासाहेबांची शिवसेना” नाम फलकाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
शिवसैनिकांनी पुन्हा शून्यातून आपण सुरुवात करत आहोत. असे समजून कार्य करायला सुरुवात करावी, आपले सरकार लोककल्याणकारी योजना राबवत आहे.लोक कल्याणाचे निर्णय घेतले आहेत, त्या योजनांची माहिती सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचली पाहिजे. बाळासाहेबांचे विचार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रूपाने महाराष्ट्रामध्ये प्रत्यक्षात उतरत आहेत. ते विचार घराघरात पोहोचवणे हे आपले नैतिक कर्तव्य आहे. याची जाणीव ठेवून शिवसैनिकांनी सक्रिय व्हावे. असेही आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी शिवसेना महिला तालुका संघटक जनाबाई सुभाष राठोड, नागलगावचे सरपंच सुभाष राठोड उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजक शहर प्रमुख देवेंद्र कांबळे, शहर संघटक विक्रम भैया आर्य, उपशहर प्रमुख रोहित बोईनवाड, आणि पदाधिकाऱ्यांनी आयोजन केले होते. या प्रसंगी या प्रभागासाठी शाखाप्रमुख म्हणून प्रशांत घोलप, उपशाखाप्रमुख म्हणून राज सकट, शाखा संघटक म्हणून सुनील कसबे, बूथ प्रमुख म्हणून सागर कलबुर्गे, उपप्रमुख अजय कांबळे व पवन कांबळे, दिनेश सकट, गजेंद्र कांबळे, राहुल कांबळे, राहुल बागबंदे, गणेश पारसेवार, अभिजीत बेद्रे, नितीन सुरनर, अक्षय कळसे, करण उपाध्ये, जय उपाध्ये इत्यादी मान्यवर शिवसैनिक उपस्थित होते.
पुढे बोलताना पटवारी म्हणाले की, प्रत्येक शिवसैनिकांनी राजकारणापेक्षा समाजकारणाला प्राधान्य द्यावे. आपण या समाजाचे काही देणे लागतो, ही भूमिका घेऊन आपले सरकार काम करत आहे. त्यामुळे आपले सरकार आपल्या रूपाने जनतेच्या समोर आले पाहिजे. कार्यकर्त्यावरून नेत्यांची ओळख होत असते. याची जाण ठेवून आणि बेभान होऊन काम करावे. कर्मधर्म संयोगाने बाळासाहेबांची शिवसेना लोकप्रियतेचे शिखर गाठत आहे. ती लोकप्रियता आणखी वाढली पाहिजे. यासाठी आपल्याला काम करावे लागणार आहे, असेही आवाहन त्यांनी केले.
