५० व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न
देवणी (रणदिवे लक्ष्मण) : पंचायत समिती शिक्षण विभाग देवणी व विवेक वर्धिनी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय देवणी यांच्या संयुक्त विद्यमाने 50 व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनचे उद्घाटन येथील विवेक वर्धिनी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय देवणी येथे झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी व्यंकटराव बोईनवाड हे होते .तसेच प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष भगवानराव रामचंद्रराव पाटील तळेगावकर , तहसीलदार सुरेश घोळवे , पंचायत समिती देवणीचे गट विकास अधिकारी महेश सुळे, या काॅलेजचे प्राचार्य वाघंबर कांबळे , उपप्राचार्य धनाजी राजे हे उपस्थित होते.
या विज्ञान प्रदर्शनात उच्च प्राथमिक गटातून सादरीकरणासाठी (इयत्ता 6 वी ते 8वी ) एकूण 21प्रयोग व माध्यमिक व उच्च माध्यमिक गटातून सादरीकरणासाठी ( इयत्ता 9 वी ते 12 वी ) आणि उच्च प्राथमिक शिक्षक गटातून 03 व माध्यमिक शिक्षक गटातून 03 असे एकूण 40 प्रयोग समाविष्ट झाले. असे तालुका विज्ञान विभाग प्रमुख आबासाहेब भद्रे विषय साधनव्यक्ती तथा सहाय्यक प्रकल्प अधिकारी साक्षर भारत व तालुका गणित विभागप्रमुख विष्णूदास मोरे यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे उदघाटन तहसीलदार सुरेश घोळवे यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले.तसेच या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटसमन्वयक सदाशिव साबणे यांनी केले.या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून या काॅलेजचे उपप्राचार्य धनाजी राजे यांनी उत्कृष्ट मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी गट साधन केंद्रातील सर्व कर्मचारी व विवेक वर्धिनी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले .सूत्रसंचालन राजकुमार जाधव यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रवीण डोईजोडे यांनी मानले.
