वाढवणा पोलीस स्टेशन मध्ये रेझिंग डे साजरा

वाढवणा पोलीस स्टेशन मध्ये रेझिंग डे साजरा

वाढवणा बु (हुकूमत शेख) : वाढवणा येथील पोलीस स्टेशन मध्ये पोलीस वर्धापन दिनानिमित्त मौजे वाढवणा बु. येथील जि. प.कन्या प्रशाला येथील आठवी, नववी,दहावी च्या वर्गातील विद्यार्थिनींना कायदे विषयक जनजागृती तसेच मोबाईल वरून ऑनलाईन होणाऱ्या फसवणुकी बद्दल मार्गदर्शन करण्यात आले. तसेच सदर कार्यक्रमात पोलीस स्टेशन वाढवणा येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक नौशाद पठाण व पोलीस उपनिरीक्षक गायकवाड व शिक्षकानी मार्गदर्शन केले. तसेच पोलिस अंमलदार यांनी विद्यार्थ्यांनींना पोलीस स्टेशन मधील उपलब्ध शस्त्रांबाबत माहिती दिली. व पोलीस स्टेशन येथे चालणारे दैनंदिन कामकाज तसेच शस्त्रागार, वायरलेस यंत्रणा, फिंगरप्रिंट यंत्रणा व लाॅकअप आदी बाबत विद्यार्थ्यांनींना माहिती दिली. व विध्यार्थिनीच्या मनात पोलिसांबद्दल असलेली उत्सुकता तसेच त्यांच्या कामकाजाबद्दलची माहिती प्राप्त झाल्याने विद्यार्थीनीं आनंदित दिसत होत्या. कार्यक्रमास पोलीस स्टेशन वाढवणा येथील पोलीस कर्मचारी व महिला कर्मचारी तसेच जिल्हा परिषद कन्या प्रशालाचे मुख्याध्यापक मझहरेनुर शेख, शिक्षक सुरनर महिला शिक्षिका मळभागे, सुमय्या पठाण व विध्यार्थिनी उपस्थित होत्या.

About The Author

error: Content is protected !!