डॉ. वैष्णवी गजानन भुसारे यांना डेंटल पदवी प्रधान
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील दैनिक पुण्यनगरी चे तालुका प्रतिनिधी स्वर्गीय गजानन भुसारे यांची कन्या वैष्णवी गजानन भुसारे ही कर्नाटक राज्यातील बिदर येथे एस बी पाटील इन्स्टिट्यूट फॉर डेंटल सायन्स अँड रिसर्च या संस्थेतून बी डी एस पदवी प्राप्त केल्याबद्दल एअर फोर्स बिदर स्टेशनचे प्रमुख एअरकमोडर समीर सौंधी यांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर बिदर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स संचालक डॉक्टर शिवकुमार शेटकार, सोमनाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सूर्यकांत पाटील, प्राचार्य शैलेंद्र माशाळकर, संचालक अमर पाटील येरोळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
गेल्या सहा महिन्यापूर्वी पत्रकार गजानन भुसारे यांचे अकाली निधन झाले होते. सदरचा दुःखाचा धक्का पचवून डॉक्टर वैष्णवी ने हे यश संपादन केले आहे. वैष्णवीच्या आई श्रीमती विजया भुसारे या पंचायत समिती येथे ग्राम विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. या नेत्र दीपक यशाबद्दल टागोर शिक्षण समितीचे अध्यक्ष डॉक्टर अशोक सांगवीकर, सचिव शिक्षण महर्षी डी बी लोहारे गुरुजी, भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेश दादा हाके पाटील, प्राचार्य रेखाताई हाके पाटील, माजी मंत्री बाळासाहेब जाधव, आमदार बाबासाहेब पाटील, माजी मंत्री विनायकराव पाटील, माजी आमदार बऋ वाहान खंदाडे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमोल आंदेलवार, पुण्यनगरीचे वृत्तसंपादक रामभाऊ जेवरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर हनुमंत वडगावे, डॉक्टर शैलेश माकणे, डॉक्टर विश्वनाथ बिराजदार, महात्मा बसवेश्वर समता पुरस्कार विजेते राम तत्तापुरे, मुख्याध्यापिका आशा रोडगे, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा. विश्वंभर स्वामी, पत्रकार संघाचे अध्यक्ष बाशिदखान पठाण, पत्रकार शिवानंद भुसारे यांच्यासह मित्रपरिवारानी अभिनंदन आणि कौतुक केले आहे.
