संत ज्ञानेश्वर विद्यालयाचे पाचवी शिष्य वृत्ती परीक्षेत वीस विद्यार्थी गुणवत्ता यादीत
अहमदपूर (गोविंद काळे) : जुलै 2022 महिन्यात घेण्यात आलेल्या पूर्व प्राथमिक पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत संत ज्ञानेश्वर विद्यालयाचे विक्रमी तब्बल वीस विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत आलेले असून लातूर जिल्ह्यात पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत संत ज्ञानेश्वर विद्यालय गुणवत्तेच्या अव्वल स्थानावर राहिल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे.
लातूर जिल्ह्यात सर्वप्रथम येण्याचा मान या शाळेने मिळवलेला असून त्यात श्रावणी हरिदास भंडे 278 गुण घेऊन लातूर जिल्ह्यात सर्वप्रथम, गार्गी चंद्रशेखर नळेगावकर 278 गुण घेऊन लातूर जिल्ह्यात द्वितीय, श्रीजल बालाजी नवलागिरे 260 गुण घेऊन जिल्ह्यात आठवा, सानिका भानुदास खुर्दळे २५८ गुण घेऊन जिल्ह्यात नववा, यशराज रमेश सूर्यवंशी 250 गुण घेऊन जिल्ह्यात 14 वा, तन्वी मनोज पस्तापुरे 248 गुण घेऊन जिल्ह्यात सोळावा, धनराज सिद्धार्थ कांबळे 248 गुण घेऊन जिल्ह्यात सतरावा, वैष्णवी मुरलीधर भारती 238 गुण घेऊन जिल्ह्यात 24 वा, वीरेन विजयकुमार गुंडरे 222 गुण घेऊन जिल्ह्यात एकोन पन्नासावा, आयुष्य राजकुमार पोळ 222 गुण घेऊन जिल्ह्यात 46वा, सोहम बिभीषण नागरगोजे दोनशे बावीस गुण घेऊन जिल्ह्यात 48 वा, वेदांत चंद्रकांत घोगरे 216 गुण घेऊन जिल्ह्यात 59 वा, रोहन विनोद वट्टमवार 214 गुण घेऊन जिल्ह्यात 68 वा, सुखदेव सोपान सुरवसे 212 गुण घेऊन जिल्ह्यात 76 वा, संकल्प बाबासाहेब वाघमारे 206 गुण घेऊन जिल्ह्यात 92 वा, दिव्या विशाल हामने 204 गुण घेऊन जिल्ह्यात शंभरावा, राजश्री शिवकांत नुल्ले दोनशे गुण घेऊन जिल्ह्यात 108 वी, रणधीर प्रतापसिंह ठाकुर 200 गुण घेऊन जिल्ह्यात114 वा, गोरक्ष रामकिशन आलापुरे १९६ गुण घेऊन जिल्ह्यात 135 वा, वरद अनिल मुंडे 194 गुण घेऊन जिल्ह्यात 144 वा आलेला आहे. या विद्यार्थ्यांना सविता पाटील, शारदा तिरुके, सतिष साबणे आणि त्रिगुणा मोरगे यांनी विशेष मार्गदर्शन केले होते. या गुणवंत विद्यार्थी व पालकांचा सत्कार संस्था सचिव प्राचार्या रेखाताई तरडे, गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला आहे. या नेत्रदीपक यशाबद्दल गणेश शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेश दादा हाके पाटील, सचिव प्राचार्य रेखाताई तरडे पाटील, समन्वयक कुलदीप भैय्या हाके मुख्याध्यापिका आशा रोडगे मुख्याध्यापक उद्धव शृंगारे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे.
