शिवसेना उपजिल्हा प्रमुख बालाजी रेड्डी यांनी कोपरा येथील पीडित तरुणीच्या घरी दिली भेट
अहमदपूर ( गोविंद काळे ) : तालुक्यातील कोपरा येथे एका तरुणीवर झालेल्या अन्यायाबद्दल कोपरा येथील घरी जाऊन पीडित मुलीच्या घरच्यांना भेट घेतल्यानंतर पिडीत तरुणीला न्याय मिळवून देणार . तिला व तिच्या कुटूंबियांना संरक्षण व न्याय देणार असल्याचे शिवसेना उपजिल्हा प्रमुख बालाजी रेड्डी यांनी सांगीतले. व हा एक नाजूक प्रसंग आहे. कोणीही भावनिक न होता कायदा हातात घ्यायचा प्रयत्न करू नये. जाती -जाती मध्ये सलोखा ठेवावा व तेढ निर्माण होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी असेही आवाहन केले.
तसेच हिम्मतराव जाधव (अप्पर पोलीस अधीक्षक) व लांजीले (उपविभागीय पोलीस अधिकारी) यांना फोन करून या प्रकरणाची निपक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कार्यवाही करावी असे सांगितले. किनगाव येथील स.पो.नि. बंकवाड यांची पोलीस स्टेशनमध्ये भेट घेऊन प्रकरणाची योग्य ती चौकशी करून पिडित तरुणीला न्याय द्यावा असे सांगितले. यावेळी भारत सांगवीकर (शहर प्रमुख,राजूर), तिरुपती पाटील (उपतालुका प्रमुख,राजूर), गणेश पांचाळ(उपतालुका प्रमुख,राजूर), संतोष आदटराव (युवासेना उपतालुका प्रमुख,राजूर), लक्ष्मण गुट्टे(विभाग प्रमुख,किनगाव), बस्वराज शिलगिरे(उपविभाग प्रमुख,किनगाव), गजानन यन्ने (उपविभाग प्रमुख ,धानोरा), मदन बोडके(संभाजी सेने जिल्हा सरचिटणीस), आशिष स्वामी, परमेश्वर विगवे, विजय सोळंके, पलमटे (पोलीस पाटील कोपरा), सुधीर सुरवंशी, बालाजी कदम, गजानन तोरकडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.