जबरी चोरी करणाऱ्या आरोपींना अवघ्या 2 तासात चोरलेल्या मुद्देमाल व हत्यारासह अटक

जबरी चोरी करणाऱ्या आरोपींना अवघ्या 2 तासात चोरलेल्या मुद्देमाल व हत्यारासह अटक

लातूर (एल.पी.उगीले) : लातूर जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक सर्व प्रभारी पोलीस स्टेशनला योग्य त्या सूचना देत आहेत, काही पोलीस स्टेशनचे निर्णावलेले कर्मचारी आणि अधिकारी सोडले तर इतर जन मात्र प्रामाणिकपणे कार्य करून कर्तव्य बजावत आहेत. मुठभर कामचोरमुळे प्रामाणिक अधिकारी देखील विनाकारण बदनाम होत असल्याची चर्चा आहे. मारहाण करून जबरी चोरी करणाऱ्या आरोपीला अवघ्या दोन तासाच्या आत अटक करण्यात एमआयडीसी पोलिसांना यश आले आहे.

फिर्यादी हा मोटरसायकलवर पाखरसांगवी शिवारातील तळ्यावर मासे पकडण्यासाठी गेला होता. सायंकाळी 06.30 वाजेच्या सुमारास दोन अनोळखी व्यक्ती मोटरसायकलवर येऊन फिर्यादीला लाथा बुक्क्यांनी मारहाण करून, कत्तीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देऊन त्याच्या खिशातील 6 हजार 220 रुपये बळजबरीने काढून घेतले. या तक्रार वरून   एमआयडीसी येथे गु.र.न. 05/ 2023 कलम 394 ,34 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदरचा गुन्हा दाखल होताच पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी नमूद गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याकरिता सूचना व मार्गदर्शन करून अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे, उपविभागीय पोलिस अधिकारी जितेंद्र जगदाळे यांचे मार्गदर्शनात एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या पथकाने फिर्यादीने सांगितलेल्या वर्णन व चेहरेपट्टीवरून अवघ्या दोन तासात गुन्ह्यातील संशयित आरोपी नामे सिद्धार्थ विजय कांबळे( वय 23 वर्ष राहणार स्वराज्य नगर ,पाखरसांगवी),  किशोर विनायक जाधव,( वय 23 वर्ष, राहणार वडारगल्ली, स्वराज्य नगर, पाखरसांगवी, लातूर.)यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे कबूल करून गुन्ह्यात चोरलेली रोख रक्कम 6,220/- रुपये, गुन्ह्यात वापरलेली एक लोखंडी कत्ती व मोटरसायकल त्यांच्याकडून जप्त करून त्यांना नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे.

सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात व पोलीस ठाणे एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक डाके, लोखंडे ,सहायक फौजदार सर्जेराव जगताप, पोलीस अंमलदार भीमराव बेल्हाळे ,अर्जुनसिंग राजपूत, गोविंद चामे, सिद्धेश्वर मदने, ईश्वर तुरे, महेश गाडे, राम जाधव यांनी केली आहे.

About The Author

error: Content is protected !!