आमदार संजय बनसोडे यांच्याकडून नवनिर्वाचित ग्रामपंचायत पदाधिका-यांचा सत्कार

आमदार संजय बनसोडे यांच्याकडून नवनिर्वाचित ग्रामपंचायत पदाधिका-यांचा सत्कार

उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर तालुक्यातील नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये विजयी झालेले सरपंच पदाचे उमेदवार व ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार ग्रामपंचायतने दिलेल्या निमंत्रणाचा स्वीकार करून माजी मंत्री तथा उदगीर मतदार संघाचे आ. संजय बनसोडे यांनी उदगीर तालुक्यातील तोंडार व देऊळवाडी या गावातील सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांचा शाल, पुष्पहार देऊन सत्कार करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी तोंडार येथील ओमसाई मित्र मंडळाच्या वतीने आ. संजय बनसोडे यांना निमंत्रण देण्यात आले होते. मित्रमंडळाच्या विनंतीला मान देवून आ. संजय बनसोडे यांनी नुतन सरपंच भरत कोचेवाड, उपसरपंच प्रयागबाई नावंदे, सागर लिंबाळे, मनोहर सोनकांबळे, रामेश्वर बिरादार, नीळकंठ बिरादार, छायाबाई कांबळे, आदी सह सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले, माजी पंचायत समिती सदस्य राजेंद्र पाटील, माजी उपसरपंच प्रल्हाद पाटील, संदीप बिरादार, संदीप राजेंद्र पाटील, प्रा.श्याम डावळे, वाढवण्याचे सरपंच नागेश थोंटे यांच्यासह तोंडार येथील प्रतिष्ठित नागरीक उपस्थित होते.
उदगीर तालुक्यातील देऊळवाडी येथील तरुण सरपंच शुभम केंद्रे व उपसरपंच संतोष केंद्रे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य सावित्रा गडीकर, रशीदबी मुंजेवार, शोभाबाई गुट्टे, बाजीराव ढोले, रेणुकाबाई केंद्रे, शशिकलाबाई गडीकर, शितल केंद्रे, भीमराव बलांडे आदींचाही आ. संजय बनसोडे यांनी सत्कार करुन शुभेच्छा दिल्या. यावेळी देऊळवाडी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!