वाहतूक नियंत्रक शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते दर्पण दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान

वाहतूक नियंत्रक शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते दर्पण दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान

देवणी (रणदिवे लक्ष्मण) : ६ जानेवारी हा दिवस मराठी पत्रकार दिन म्हणून महाराष्ट्रात साजरा केला जातो. ‘दर्पण’ या पहिल्या मराठी वृत्तपत्राच्या माध्यमातून देशात मराठी पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवणारे ‘बाळशास्त्री जांभेकर’यांचा जन्मदिवस आहे.मराठी वृत्तपत्राचे जनक, आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे मराठीतील सर्वात पहिले वृत्तपत्र ६ जानेवारी रोजी सुरु केले. याच कारणामुळे ६ जानेवारी हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो, या दर्पण दिनानिमित्त देवणी बस-स्थानकात कार्यरत असलेले वाहतूक नियंत्रक शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते पत्रकार लक्ष्मण रणदिवे,विष्णू बिरादार यांच्या हस्ते पत्रकार जयेश ढगे व शिव-बसवेश्वर सेवाभावी संस्थेचे सचिव कल्याण धनुरे यांच्या हस्ते पत्रकार जितेश रणदिवे या पत्रकारांना पुष्पहार घालून बस स्थानकात सत्कार करण्यात आला. सत्कारात मनोहर कासले व्यापारी ,शंकर कांबळे,सुनील सूर्यवंशी,बंडू होनमाणे,विष्णू बिरादार कांबळे कोंडल,आदी बस-स्थानकातील नागरिक उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!