डॉ होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षेत किलबिलचे 12 विद्यार्थी उत्तीर्ण

डॉ होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षेत किलबिलचे 12 विद्यार्थी उत्तीर्ण

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील किलबिल नॅशनल स्कुल शाळेतील एकूण 12 विद्यार्थ्यांनी डॉ होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षेत घवघवीत यश संपादित केले आहे. विद्यार्थ्यांमध्ये सृजनशीलता, वैज्ञानिक दृष्टिकोन यांना चालना मिळण्यासाठी दरवर्षी राज्यस्तरावरून ही परीक्षा घेतली जाते. या परीक्षेत शाळेची कु शर्वरी बाळासाहेब बयास हीची प्रात्यक्षिक परीक्षेसाठी निवड झाली असून कु तेजल मालू, आर्या साकोळे, माही कांबळे, नम्रता नागरगोजे, मैथिली राठोड, सुरज पाटील, सुरज होळकर, रोनक भुतडा, प्रणव जगताप, वेदांत दावणगावे, सुरज शेळके अशा 12 विद्यार्थ्यांनी या होमी भाभा परीक्षेत उत्तीर्ण होऊन यश संपादन केले . सदरील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे शाळेच्या वतीने संस्थेचे सचिव ज्ञानोबा भोसले, प्राचार्य संतोष पाटील पर्यवेक्षक महावीर गोडभरले आदींनी अभिनंदन करून पुढील परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.

About The Author

error: Content is protected !!