माजी मंत्री आमदार संजय बनसोडे ‘विकासपुरुष’ पुरस्काराने सन्मानित
उदगीर (एल.पी.उगीले) : येथील श्री सद्गुरु हावगीस्वामी महाराज मठ संस्थानच्या वतीने श्री श्री डाॅ. शंभुलिंग शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते माजी मंत्री आ.संजय बनसोडे यांना ‘विकासपुरुष’ हा पुरस्कार देवून त्यांचा सन्मान करण्यात आला.
येथील श्री सद्गुरु हावगीस्वामी महाराज मठ येथे महामंगल आरतीस आमदार संजय बनसोडे हे उपस्थित होते. उदगीर विधान सभा मतदार संघाचा मागील अनेक वर्षाचा विकासाचा बॅकलॉग माजी राज्यमंत्री आ. संजय बनसोडे यांनी भरून काढला, व मतदारसंघात विकासाची गंगा आणली. मागील २ वर्षाच्या काळातही कोरोना सारख्या महामारीच्या काळातही आ.बनसोडे यांनी आपल्या मतदारसंघात तळ ठोकून होते. आपल्या नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत होते. या कठीण काळातही शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून विविध विकास कामासाठी सतराशे ते अठराशे कोटी रुपयांचा निधी शासनाकडून उपलब्ध करून घेवुन मतदार संघाला प्रगतीपथावर घेवुन जात आहेत. महाराष्ट्रात मतदार संघाची नवी ओळख निर्माण केली व देशाच्या नकाशावर उदगीर शहराची एक साहित्यनगरी म्हणून नवी ओळख निर्माण केली. समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी ते सतत धडपडत असतात. गोर गरीब व कष्टक-यांचे नेतृत्व ते करत आहेत. शहरात विविध समाजासाठी भवनची निर्मिती त्यामध्ये लिंगायत भवन, बौद्ध विहार, आण्णाभाऊ साठे सभागृह, छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन, शासकीय विश्रामगृह, प्रशासकीय इमारत, पंचायत समितीची इमारत, तहसीलची इमारत, मुस्लीम शादीखाना, पाण्यासाठी वाटरग्रीड योजना, तिरु बँरेजेस, जळकोट उदगीर शहरात महापुरूषांचे पुतळे, मतदार संघाला जोडणारे सर्व मुख्य रस्ते, शहरातील अंतर्गंत रस्त्यासह नागरिकांना विविध मूलभूत योजना आदीसह विविध विकासकामे केली असुन असे विकास काम करणारे लोकप्रतिनिधी मतदार संघाला भाग्याने मिळतो, म्हणून आ. संजय बनसोडे यांना “विकासपुरुष” पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.
यावेळी सिध्दलिंग शिवाचार्य महाराज, कौळासकर महाराज, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर, माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, वीरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत वैजापुरे, बाबुराव समगे, भिमाशंकर हिरमुखे, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष कल्याण पाटील, शिवसेनेचे कैलास पाटील, मुख्याधिकारी शुभम क्यातमवार, श्रीकांत पाटील, प्रा.श्याम डावळे, सुभाष धनुरे, हरकरे, अँड. गुणवंतराव पाटील, उमेश पाटील, माजी नगरसेवक मनोज कपाळे, माजी नगरसेविका रेखा कानमंदे, बस्वराज समगे, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवराज नावंदे गुरुजी यांनी केले. सुत्रसंचालन विरभद्र स्वामी यांनी केले, तर आभार प्रा.मल्लेश झुंगास्वामी यांनी मानले.
