तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये लालबहादूर शास्त्री विद्यालयाचा द्वितीय क्रमांक

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये लालबहादूर शास्त्री विद्यालयाचा द्वितीय क्रमांक

उदगीर (एल.पी.उगीले) पंचायत समिती शिक्षण विभागातर्फे आयोजित ५० व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये लाल बहादूर शास्त्री विद्यालयाने द्वितीय क्रमांक पटकावला असून पुढील ५० व्या जिल्हास्तरिय विज्ञान प्रदर्शनासाठी विद्यालयाची निवड झाली आहे.

या प्रदर्शनासाठी निवड झालेल्या प्रयोगाचे नाव होम युटीलिटी असे आहे. प्रयोग सादरीकरणात वायचळे गजानन, बिबीनवरे अभिजीत , मठपती ओम, केंद्रे मयूर या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.या यशस्वी विद्यार्थ्यांना विज्ञान शिक्षिका सविता कोरे यांचे मार्गदर्शन लाभले. प्रदर्शनात यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकाचे भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुरेंद्र आलूरकर ,उपाध्यक्ष जितेशजी चापशी ,कार्यवाह डॉ.हेमंत वैद्य ,संकुलाचे अध्यक्ष मधूकरराव वट्टमवार , कार्यवाह तथा केंद्रीय कार्यकारी समिती सदस्य शंकरराव लासूणे ,शालेय समितीचे अध्यक्ष सतनप्पा हुरदळे ,मुख्याध्यापक बाबूराव आडे ,उपमुख्याध्यापक अंबादास गायकवाड पर्यवेक्षक बलभीम नळगीरकर,लालासाहेब गुळभिले ,माधव मठवाले यांनी कौतुक केले व पुढील प्रदर्शनासाठी शुभेच्छा दिल्या.

About The Author

error: Content is protected !!