9 जानेवारीला राष्ट्रीय एकात्मता कार्यक्रमाचे आयोजन

उदगीर (एल.पी.उगीले) : भारताच्या एकता,अखंडता आणि सुरक्षिततेसाठी अनेक देशभक्तांनी केलेल्या प्रयत्नांना उजाळा देण्यासाठी जमीयत-ए- उलेमा, मराठवाडा च्या वतीने दिनांक 9 जानेवारी 2023 रोजी राष्ट्रीय एकात्मता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जमहूर हायस्कूल चर्च रोड उदगीर येथे संपन्न होणाऱ्या या कार्यक्रमाचे आयोजन हजरत मौलाना मुहम्मद इसराइल रशीदी खासमी यांचा मार्गदर्शनात करण्यात आली आहे. सदरील कार्यक्रमाची अध्यक्षता मौलाना एजाजुल हक कुरैशी करतील. या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ता म्हणून हजरत मौलाना पी.एम मुजम्मिल वालाजाही, तसेच हजरत मौलाना मुफ्ती उवेस खासमी उपस्थित राहतील. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून हजरत मौलाना अनवरुल हक मुफ्ताही, हजरत मौलाना हाफिजुल इस्लाम, हजरत मौलाना माजूल इस्लाम खासमी, हजरत मौलाना जियाउल हक कुरेशी, हजरत मौलाना मुफ्ती एहतेशामुल हक, हजरत मौलाना इमाद ओद्दीन खासमी, हाफिज मुहम्मद इरशाद अहमदपुर, कादरी हिफ्जुर्र रहेमान देवनी आदींची विशेष उपस्थिती असणार आहे. देश बांधणीच्या व एकात्मतेबद्दलच्या वचनबद्धतेसाठी आयोजित या कार्यक्रमासाठी सर्व उदगीरकरांनी अधिकाधिक संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जमियत- ए-उलेमा, मराठवाडा चे सचिव मौलाना नौशाद अली कास्मी यांनी केले आहे.

About The Author

error: Content is protected !!