देवणीत पत्रकारांच्या वतीने दर्पणदिन साजरा
देवणी (रणदिवे लक्ष्मण) : मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेल्या दर्पण वृत्तपत्राच्या दिनानिमत्त 6 जानेवारी रोजी देवणी येथील लासोना चौकातील आप्पाजी कॉम्प्लेक्स मध्ये देवणी तालुका पत्रकार संघाच्या वतीने दर्पण दिन साजरा करण्यात आला.
यावेळी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाला काँग्रेस पार्टीचे देवणी तालुकाध्यक्ष ॲड अजितराव बेळकोने हे होते. तसेच पत्रकार संघाचे अध्यक्ष रमेश कोतवाल,सतीश बिरादार, प्रा. रेवण स्वामी मळभागे,बाबासाहेब उमाटे, दत्ता पाटील,शकील मनियार, जाकिर बागवान,बालाजी कवठाले, लक्ष्मण रणदिवे,बालाजी टाळीकोटे,माधवराव मुर्गे,हसन मोमीन,प्रमोद लासूने,सचिन मंगनाळे, कृष्णा पिंजरे,जयेश ढगे,आनंद अंकुलगे,विक्रम गायकवाड,आदी पत्रकार उपस्थित होते. यावेळी अनेक पत्रकारांनी आपले मनोगत व्यक्त केले,सूत्रसंचालन प्रा.रेवण स्वामी मळभागे यांनी केले तर आभार रमेश कोतवाल यांनी मानले.
