महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिरास प्रारंभ
उदगीर (एल.पी.उगीले) : येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या युवकांचा ध्यास, ग्राम शहर विकास पर्यावरण, नैसर्गिक साधन संपत्ती संवर्धन व स्वच्छ भारत अभियान विशेष युवक शिबिरास प्रारंभ सोमनाथपूर ता. उदगीर येथे झाला. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मल्लिकार्जुन मानकरी होते तसेच मंचावर उपाध्यक्ष डॉ.रेखा रेड्डी, उपाध्यक्ष ॲड.प्रकाश तोंडारे, सदस्य प्रशांत पेन्सलवार, प्रभारी प्राचार्य डॉ.बी.एम.संदीकर, उपप्राचार्य डॉ.आर.के.मस्के, सरपंच अंबिका पवार, उपसरपंच अमित कुमार माडे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष पोमा पवार, शालेय समितीचे अध्यक्ष संजय राठोड, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक मलिकार्जुन स्वामी, वसंतराव नाईक विद्यालयाचे मुख्याध्यापक खुशाल बराई, ग्रामविकास अधिकारी डी.एन.रोडेवाड यांची उपस्थिती होती. यावेळी डॉ.रेड्डी म्हणाल्या, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मोबाईल कडे जास्त वेळ न घालवता अभ्यास करून सामाजिक बांधिलकीच्या भावनेने काम करावे.
यावेळी अॅड.तोंडारे म्हणाले, देशाच्या विकासामध्ये युवकांचे अनन्यसाधारण योगदान आहे. उद्घाटन समारोहाच्या समारोपात मानकरी म्हणाले की, ग्रामीण भागाच्या विकासामध्ये युवकांनी सक्रिय सहभाग द्यावा. अशा शिबिरातून व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. त्या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्यडॉ.बी.एम.संदीकर यांनी केले, सूत्रसंचलन कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ.बी.एस.होकरणे यांनी केले, तर आभार प्रा.डॉ.बंकट कांबळे यांनी मानले.
