श्यामलाल विद्यालयाचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश
उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर येथील श्यामलाल स्मारक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपले वेगळेपण जपत, सहा विद्यार्थी डॉक्टर होमीभाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. त्यांच्या या घवघवीत यशाबद्दल संस्था अध्यक्ष सुपोषपाणी आर्य, संस्था सहसचिव श्रीमती अंजुमनी आर्य, मुख्याध्यापक आनंदराव चोबळे, उपमुख्याध्यापक बालाजी चव्हाण, पर्यवेक्षक राहुल लिमये यांनी या स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मेडल, पुष्पहार देऊन गौरवांवित केले केले आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये बिरादार शुभांगी बसवराज, संचिता तोडगिरे, बाजीराव सोनटक्के, योगेश केंद्रे, संदेश तोडगिरे, आदित्य फुलारी यांचा समावेश आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांना विज्ञान विभाग प्रमुख राहुल लिमये, अविनाश घोळवे, श्रीमती आसमा शेख यांनी मार्गदर्शन केले. मार्गदर्शकांचेही अभिनंदन केले जात आहे.
