शिक्षकांचा परिक्षावर बहिष्काराचा इशारा
मंजुर अनुदानाच्या वितरणासाठी शिक्षक अाक्रमक.
अहमदपुर ( गोविंद काळे ) : राज्यातील हजारो शिक्षक मागच्या अठरा ते विस वर्षापासुन विनावेतन काम करत अाहेत अाणि ते अापल्या हक्काच्या पगारापासुन वंचित अाहेत.कित्येक शिक्षकांनी अापली जिवन यात्रा संपविली अाहे.अात्महत्या,हर्टअटॅक,विविध अजारांनी शेकडो शिक्षक मरण पावली अाहेत तर हजारो बांधव विनापगार सेवानिवृत्त झाले अाहेत.अापल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी देश घडवणार्या शिक्षकांवर फळे विकणे,चहा विकणे,सुपारी घासणे,चप्पल विकणे,अॅटोरिशा चावलणे,दुसर्याच्या दुकानात,शेतात रोजंदारी करण्याची वेळ या अाघाडी,महायुती व महाविकास अाघाडी शासनांनी अाणली अाहे.
शासन प्रत्येक अधिवेशनात निधी मंजुर करते परंतु त्याच्या वितरणाचा अादेश मात्र काढत नाही अाणि तो लवकरात लवकर निधी वितरणाचा अादेश निघावा यासाठी अहमदपुर तालुक्यातील शिक्षकांनी बोर्ड परिक्षेच्या कामकाजावर बहिष्कार करण्याचे असहकाराचे शस्त्र उपसले अाहे.जोपर्यंत निधी वितरण होत नाही तो पर्यंत परिक्षेचे कोणतेही काम केले जाणार नसल्याचे सांगितले गेले.
अहमदपुर उपविभागिय अधिकारी यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.उध्दवजी ठाकरे,उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री मा.ना.अजित पवार व राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री मा.ना. प्रा.वर्षा गायकवाड यांना अहमदपुर तालुका शिक्षक समन्वय संघाच्या वतीने बोर्ड परिक्षेच्या कामाकाजावर बहिष्कार करत असल्याचे निवेदन देण्यात अाले.या निवेदनातील प्रमुख मागण्या १) १५/११/११ व ४/६/२०१४ नुसार सुत्र लागु करुन निधी वितरीत करण्यात यावा.
२)दि.१२/०२/२०२१ व १५/०२/२०२१ मधिल त्रूटी पुर्तता करणार्या शाळा व २४/०२/२०२१ रोजी घोषीत कोल्हापुर व मुंबई विभागाचा निधीच्या पुरवणीत समावेश करुन निधी वितरीत करावा.
३)सर्व अघोषीत प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व २०१२-१३ च्या तुकड्या निधीसह घोषीत कराव्यात ४)विनानुदानीत व अंशतः अनुदानीत शाळावरील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांना वैद्यकिय प्रतिपुर्ती लागु करावी. ५) सेवा संरक्षण मिळावे.अशा स्वरुपाच्या मागण्या अाहेत.
निवेदन देण्यासाठी तालुक्यातील २०० च्या जवळ जवळ विनानुदानीत शिक्षक जमा होणार होते परंतु कोरोनाची पार्श्वभुमी लक्षात घेता प्रातिनीधीक स्वरुपात शिक्षक उपस्थीत राहुन निवेदन देण्यात अाले.या निवेदनावर अहमदपुर तालुका शिक्षक समन्वय संघाचे बाबासाहेब वाघमारे, बलभिम जगताप, पांडुरंग नरवटे, मिना तोवर, अाबासाहेब माने, नारायण केरले, राहुल कांबळे, गायकवाड प्रदिप, मुंगल अार बी, कोढुळे रामचंद्र,काझी एस ए, सय्यद एम एम, पेड सी बी, सांगविकर पी एस, सांगुळे जी एम, जाधव एम एस, साबदे एच एच, जगताप व्ही अार, मुंडे एस व्ही, सय्यद के ए, जागीरदार एम ए, शेख मेहराज व शेख गौस अादिंच्या स्वाक्षरी अाहेत.