तीन दिवसापासून लातूर शहर अंधारात
आयुक्तांना प्रतिकात्मक कंदीलाची भेट : 24 तासात पथदिवे चालु करा अन्यथा परिणामाला सामोरे जा
लातूर (प्रतिनिधी) : गेल्या दिड वर्षापासून कोरोणाच्या संकटामुळे लातूरकर आर्थिक संकटात सापडलेले आहेत. त्यातून सावरले नाहीत तोवरच महावितरणने वीज बिलाच्या थकबाकीसाठी विज तोडण्याचा धडाका लावलेला आहे. त्याचा फटका महापलिकेलाही बसलेला आहे. 5 ते 6 महिण्यापासून पथदिव्याचे वीज बिल न भरल्याने महावितरणने शहरातील बहुतांश पथदिव्याची वीज तोडलेली आहे. 90 लाखच्या थकबाकीसाठी गेल्या तीन दिवसापासून लातूरकरांना अंधारातच रहावे लागत आहे. त्यामुळे लातूर महानगरपालिकेने येत्या 24 तासात पथदिवे चालु करावेत अन्यथा होणार्या परिणामाला सामोरे जावे लागेल, असा ईशारा भारतीय जनता पार्टी शहर जिल्ह्याच्यावतीने शहर जिल्हाध्यक्ष गुरूनाथ मगे, भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक प्रकोटचे महाराष्ट्र प्रदेश संयोजक तथा मनपा गटनेते शैलेश गोजमगुंडे, भाजयुमोचे शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर आदींनी मनपा आयुक्तांना प्रतिकात्मक कंदिलाची भेट देवून दिलेला आहे.
लातूरचे पालकमंत्री व लातूर महापालिकेचे महापौर यांनी मनपा अंतर्गत येणार्या वीज बिलाच्या थकबाकीकडे लक्ष दिलेले नाही. त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासूनची विजेची थकबाकी 9 कोटीवर गेलेली आहे. याकडे सततचे दुर्लक्ष होत असल्यामुळे महावितरणने शहरातील पथदिव्याची लाईट तोडली असल्यामुळे भर उन्हाळ्यामध्ये रात्रीच्यावेळी लातूर शहर अंधारात असल्याचे चित्र दिसून येत आहे. हे वास्तव असले तरी याबाबत कोणीही भाष्य करायला तयार नाही. लातूर हे शिक्षण व बाजारपेठेच्या बाबतीत राज्यात अग्रेसर असलेले शहर आहे. तरीही स्थानिक नेतृत्त्वाच्या निष्क्रीयतेमुळे लातूरकरांना अंधारात रहावे लागत आहे. एकीकडे कारेाणाचे संकट समोर असताना दुसरीकडे पथदिव्याची लाईट नसल्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. जनता अंधारात असताना लातूरचे पालकमंत्री मात्र मुंबईच्या प्रकाशात राहत आहेत. याबाबत कोणीही बोलत नसल्यामुळे लातूरकरांना या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ही बाब लक्षात घेवून भारतीय जनता पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष गुरूनाथ मगे, भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक प्रकोटचे महाराष्ट्र प्रदेश संयोजक तथा मनपा गटनेते शैलेश गोजमगुंडे, यांच्या नेतृत्वाखाली भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा स्वातीताई जाधव, भाजयुमोच्या प्रदेश सचिव प्रेरणाताई होणराव, भाजयुमोचे प्रदेश सचिव अॅड.गणेश गोमचाळे, भाजपा शहर संघटन सरचिटणीस मनिष बंडेवार, भाजपा युवा मोर्च्याचे शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर, भाजपा प्रदेश कार्यकारणीच्या सदस्या जयश्रीताई पाटील, मंगेश बिराजदार, श्रीराम कुलकर्णी, प्रविण सावंत, शिरीष कुलकर्णी, गोरोबा गाडेकर, हणमंत जाकते, महेश कौळखेरे, शैलेश स्वामी, संगिता रंदाळे, आदीसह नगरसवेक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मनपा आयुक्तांना प्रतिकात्मक स्वरूपात कंदीलाची भेट देवून मनपाच्या कृतीबद्दल निषेध व्यक्त करण्यात आला.
लातूरचे पालकमंत्री वैद्यकीय शिक्षण मंत्री नसून पर्यटन मंत्री आहेत – अजितसिंह पाटील कव्हेकर
लातूरची जनता अगोदरच कोरोणाच्या संकटामुळे बेजार झाली त्यातच उत्पन्नाचा कुठलाही स्त्रोत नसल्याने दैनंदिन उदरनिर्वाहाच्या प्रश्नाला सामोरे जावे लागत आहे. त्यातच मनपाने महावितरणचे पथदिव्याचे 90 लाखाचे बिल थकविल्यामुळे लातूरकरांना रात्रीच्या अंधारात बाजारासाठीही बाहेर पडनेही अडचणीचे झाले आहे. तरीही महापौर घरात अन् पालकमंत्री मुंबईच्या प्रकाशात राहत असल्याने त्यांना सर्वसामान्यांचे काहीच घेणे-देणे नाही. लातूरच्या पालकमंत्र्यांना वैद्यकीय शिक्षण मंत्र्याचा दर्जा असला तरी ते फक्त पर्यटन स्थळ असल्यासारखे लातूरला भेट देतात. परंतु नागरीकांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्यास त्यांनाही वेळ नाही. त्यामुळे ते राज्याचे वैद्यकीय मंत्री नसून पर्यटन मंत्री आहेत, अशी उपरोधिक टिकाही भाजपा युवा नेते अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी पालकमंत्री महोदयावर केली. याबरोबरच मनपाने 24 तासात पथदिवे सुरू नाही केल्यास तीव्र आंदोलनाला सामोरे जावे लागेल, असा ईशाराही त्यांनी यावेळी बोलताना दिला.