खाडगाव च्या सरपंच पदी अॅड नेताजी देशमुख तर उपसरपंचपदी अभिनंदन जाधव यांची निवड
लातूर (प्रतिनिधी) : खाडगाव ग्रामपंचायत निवडणुका मध्ये कॉग्रेस पक्ष पुरस्कृत परिवर्तन ग्रामविकास पॅनल चा एक तर्फी विजय झाला असुन सरपंच पदासह 9 सदस्य विजयी झाले.
खाडगाव च्या लोकनियुक सरपंच पदी उच्चशिक्षित कायदेतज्ञ अॅड नेताजी देशमुख यांची निवड झाली तर निवडणुक निर्णय अधिकारी आळंगे साहेब, ग्रामसेवक उत्तमबापु गोमसाळे यांच्या समक्ष अभिनंदन जाधव यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाली या प्रसंगी ग्राम पंचायत सदस्य दौलत देशमुख, शेख शबाना, सौ सुकुमार हनुमंत साळुंके, श्रीमती सुमिञा सगर, नेताजी कांबळे, विठ्ठल मगर, कांताबाई मगर, कांताबाई मस्के आदी नवनियुक्त सदस्य उपस्थीत होते या प्रसंगी समस्त गावकऱ्यांनी सरपंच उपसरपंच व सदस्य यांचे अभिनंदन करुन सत्कार केला.
