उदगीरच्या कुस्त्या ऐतिहासिक झाल्या पाहिजेत – आ.बनसोडे
उदगीर (एल.पी.उगीले) : येथील श्री गुरु हावगीस्वामी यात्रेमुळे उदगीर शहरात सर्वत्र चैतन्य व भक्तीमय वातावरण आहे. या यात्रेनिमित्त श्री हावगीस्वामी मठात परमरहस्य पारायण, भजन, किर्तन, प्रवचन, आर्शिवचन विविध साधु संताच्या वाणीतून होत आहे. काल शहरातुन भव्य दिव्य पालखी सोहळा काढण्यात आला होता. लाखो भाविकांना दररोज अन्नदान केले जात आहे. प्रतिवर्षाप्रमाणे उदगीर आडत असोसिएशनच्या वतीने जंगी कुस्त्याचा कार्यक्रम घेताला जातो, ही बाब अभिमानाची व कौतुकाची असुन आपण सर्वांनी मैदानी खेळाला महत्व देत आपली प्रथा आणि परंपरा पुढच्या पिढीमध्ये व समाजात रुजवावी. असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री तथा आ. संजय बनसोडे यांनी व्यक्त केले. ते श्री गुरु हावगीस्वामी यात्रेनिमित्त उदगीर आडत असोसिएशनच्या वतीने जंगी कुस्त्याचा कार्यक्रमाप्रसंगी उद्घाटक म्हणून बोलत होते.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस तथा माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, उदगीर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष कल्याण पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष समीर शेख, आडत असोसिशनचे अध्यक्ष संभाजी घोगरे,उपाध्यक्ष रामदास काळगापुरे, लंदवाडकर अप्पा, आप्पासाहेब पाटील, मल्लिकार्जुन बिरादार, गौतम पिंपरे, मल्लीनाथ बिरादार, तातेराव पाटील, शरणप्पा करुळे, शेषेराव बिरादार,मनोज बिरादार, संतोष श्रीनेवार, पेठे, बालाजी नराचे, प्रताप जाधव, पंकज कालानी, कमलाकर भंडे, अनंत बोंद्रे, व कुस्तीचे मल्ल उपस्थित होते.
पुढे बोलताना आ. संजय बनसोडे यांनी, उदगीर आडत असोसिएशनच्या वतीने जंगी कुस्त्याचा कार्यक्रम घेतला असुन ह्या आपल्या उदगीरच्या कुस्त्या ऐतिहासिक झाल्या पाहिजेत. यासाठी सर्वांनी याची प्रसिध्दी करून मोठा गाजावाजा शहर व परिसरात केला पाहिजे. आपल्या मातीचा खेळ म्हणून आपण विविध खेळ खेळत असतो, त्यासोबतच कुस्त्यांचे खेळ खेळले पाहिजेत. आपल्या भागातुन जास्तीत जास्त खेळाडु तयार व्हावेत. यासाठी आपण विविध खेळाडुंना प्रोत्साहन दिले पाहिजे. असे आ. संजय बनसोडे यांनी सांगितले. यावेळी आ. बनसोडे यांच्या वतीने विविध कुस्त्यासाठी पारितोषिके देवून शेवटच्या कुस्तीसाठी अकरा हजार रूपयाचे पारितोषिक देण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नंदकुमार पटणे यांनी केले. यावेळी कुस्तीप्रेमी, खेळाडु व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
