उदगीर पोलिसांचे पुन्हा धिंडवडे!!
एलसीबी कडून जुगार अड्ड्यावर धाड!!!

उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर शहर आणि ग्रामीण भागात जुगारांचे अड्डे, मटका आणि गुटक्याचे साम्राज्य निर्माण होत असल्या संदर्भात वार्ता साप्ताहिक पोलीस फ्लॅश न्यूज आणि इतर वृत्तपत्रातून प्रकाशित झाल्यानंतर कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी उदगीर शहर आणि ग्रामीण भागात लक्ष घातले असता, अवैध धंद्याचा बाजार उदगीर शहर आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात दिसून आला. कुठे जुगाराचे, मटक्याचे अड्डे तर कुठे जुगाराचे अड्डे आढळून आलेआले.

उदगीर पोलिसांचे पुन्हा धिंडवडे!!<br>एलसीबी कडून जुगार अड्ड्यावर धाड!!!

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक लातूरहुन उदगीरला येते, उदगीर शहरात आणि ग्रामीण भागात धाडी टाकते, अनेक गुन्हे दाखल करते. मात्र स्थानिक पोलिसांना याचे काहीच गांभीर्य वाटत नाही हे निश्चित नवल म्हणावे लागेल. प्रत्येक पोलीस स्टेशनला गुन्हे प्रगटीकरण शाखा असताना देखील हा अवैध धंद्याचा हैदोस कसा काय चालू आहे? नेमके कोणाचा आशीर्वाद आहे? या संदर्भातही उलट सुलट चर्चा आता जोर धरू लागली आहे.

निरभवलेल्या या स्थानिक पोलीस प्रशासनाच्या सुस्तपणाला आणि आदर्शवादाच्या गप्पांना बगल देत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. यासंदर्भात थोडक्यात माहिती अशी की,स्थानिक गुन्हे शाखेचा जुगार अड्ड्यावर छापा, 09 इसमाविरुद्ध मुंबई जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल 09 लाख 56 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त!

पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी लातूर जिल्ह्यात अवैध धंद्याविरुद्ध कारवाई करण्याकरिता निर्देशित केले होते.त्या अनुषंगाने अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांचे नेतृत्वात अवैध धंद्याविरुद्ध मोहीम राबविण्यात येत आहे.

अवैध धंद्यावर कारवाई करीत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दिनांक 07/01/2023 रोजी सायंकाळी 18.30 वाजण्याच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उदगीर ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील मौजे चीघळी गावाचे शिवारातील बाळासाहेब कांतराव पाटील याचे शेतातील पत्र्याच्या शेड वर छापा मारला असता, तेथे इसम नामे बाळासाहेब कांतराव पाटील (रा. चिघळी तालुका उदगीर),जनार्दन रघुनाथ पेठे, (वय 35 वर्ष, रा. गुरदार, तालुका उदगीर.), गंगाधर धोंडीबा सोनटक्के, (वय 28 वर्ष, राहणार लोहारा, तालुका उदगीर.), ओमप्रकाश बाबुराव जाधव, (भाकसखेडा, तालुका उदगीर.) वसंत कांतराव पाटील, (वय 40 वर्ष, राहणार चिघळी, तालुका उदगीर.), प्रशांत शेषराव पाटील,( वय 50 वर्ष, रा. देवर्जन, तालुका उदगीर), मनोज रामराव शिवहार,( 38 वर्ष, रा. लोहारा, तालुका उदगीर.), प्रशांत रमाकांत सोनटक्के, (रा. लोहारा, तालुका उदगीर.)बालाजी सुभाष पेठे,( वय 42 वर्ष, राहणार गुरदाळ, तालुका उदगीर),असे नमूद ठिकाणी ग्रुप करून स्वतःच्या फायद्यासाठी पत्त्यावर पैसे लाऊन तिर्रट नावाचा जुगार खेळत व खेळवीत असताना आढळून आले. त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य,रोख रक्कम, मोबाईल फोन व वाहने असा एकूण 9 लाख 56 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

नमूद आरोपी विरोधात पोलीस ठाणे उदगीर ग्रामीण येथे गु. र. क्र. 19/ 2023, कलम 12(अ) मुंबई जुगार अधिनियमा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नमूद मुद्देमाल व नऊ इसमांना पुढील तपास कामी उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात व पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्या नेतृत्वातील पथकातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शैलेश जाधव,पोलीस अंमलदार बालाजी जाधव, खुर्रम काझी, विनोद चिलमे, रवी कानगुले, नकुल पाटील यांनी केली आहे.

About The Author

error: Content is protected !!