श्यामार्य कन्या विद्यालयातील नामदेव चोपडे यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार समारंभ संपन्न
उदगीर (एल.पी.उगीले) : श्यामार्य कन्या विद्यालयातील पर्यवेक्षक नानाभाई चोपडे यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार समारंभ संपन्न झाला. यावेळी या कार्यक्रमासाठी श्यामलाल स्मारक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुपोषपाणी आर्य, सहसचिव अंजुमनीताई आर्य, श्यामार्य कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका तृप्ती ज्ञाते, नानाभाई चोपडे यांचे कुटुंबीय पत्नी व दोन मुली उपस्थित होते.
सत्कारमूर्ती नानाभाई चोपडे यांना शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. श्यामलाल कॅश क्रेडिट सोसायटी मार्फत उपाध्यक्ष वसंत गोखले, सचिव ज्ञानेश्वर सपाटे यांच्याद्वारे भरपेहराव व यथोचित सत्कार करण्यात आला .नानाभाई चोपडे हे मूळ बुलढाणा जिल्ह्यामधील चिंचपूर गावातील रहिवासी होत. श्यामलाल स्मारक शिक्षण संस्थेमध्ये त्यांची गणित विषयासाठी नियुक्ती करण्यात आली. सलग 26 वर्ष त्यांनी गणित विषयाच्या अध्यापनाचे कार्य केले. उदगीर शहरातील एक ख्यातनाम गणित विषय शिक्षक बनले. त्यांच्या अध्यापनातून अनेक विद्यार्थी शिकले. आज ते उच्च पदावर स्थानापन्न आहेत . शांत, आज्ञाधारी, सुसंस्कृत स्वभाव ,मनमिळाऊ, नम्र,वक्तशीरपणा ,कर्तव्यदक्ष समजूतदारपणा , सेवाभावी वृत्ती अशा विविध गुणवैशिष्ट्यामुळे ते समाजात व विद्यार्थ्यांमध्ये ख्यातनाम होते.
विद्यार्थ्यांमध्ये गणित विषयाची गोडी निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबवत असत. गणित विषय अध्यापनासोबतच शाळेतील सर्वात महत्त्वाचा परीक्षा विभाग खूप वर्ष सांभाळलेला होता. प्रदीर्घ सेवेनंतर ते सेवानिवृत्त होत आहेत . एक आवडीचे गणित विषय शिक्षक सेवानिवृत्त होत असताना सर्व विद्यार्थ्यांच्या डोळ्यात अश्रू होते.
राहुल गुरमे, श्रीहरी निडवंचे, माधव कांबळे, माणिक कांबळे, वैशाली अनकल्ले. वनमाला मुक्कावार ,संगीता देशमुख यांनी नानाबाई चोपडे यांच्या बद्दल आपल्या संबंधित मनोगत व्यक्त केले.
नानाभाई चोपडे यांच्यासारखा प्रामाणिक ,मनमिळावू व सेवाभावी वृत्ती असलेला शिक्षक आमच्या विद्यालयातून सेवानिवृत्त होत असताना सर्वांचे मन भरून आले. विद्यार्थ्यांमध्ये गणित विषयाची आवड निर्माण करण्यासाठी नेहमी प्रयत्न करत असत. श्यामार्य कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका तृप्ती ज्ञाते यांनी आपले मत व्यक्त केले. श्यामलाल स्मारक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुपोषपाणी आर्य व सहसचिव अंजुमनीताई आर्य यांनी पुढील आयुष्य सुख-समृद्धी, आनंदी व आरोग्यदायी जाण्याच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतनप्पा हुरदळे तर आभार महेश हुलसरे यांनी मानले.
