अतनुरात मंगळवारी मोफत दंतरोग चिकित्सा व सर्वरोग निदान शिबीर
अतनूर (एल.पी.उगीले) : साई डेंटल केअर अँन्ड इम्प्लँट सेंटर, साई हॉस्पिटल,उदगीर व जनक्रांती डोंगरी विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्था,अतनूर यांच्या संयुक्त विद्यामाने ग्रामपंचायत कार्यालय अतनूर येथे मंगळवार दि.१० जानेवारी रोजी सकाळी ११ ते ४ वाजेपर्यंत मोफत दंतरोग चिकित्सा व सर्वरोग निदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरात प्रसिध्द लेप्रोसोपीक तथा सर्जन डॉ.माधव वीरप्पा चंबुले, मुख व दंतरोग तज्ञ डॉ.सुशील टी.चंबुले, जनरल फिजिसियन डॉ.संदीप नादरगे येणाऱ्या रूग्णांची तपासणी करणार आहेत. तसेच आयोजक व संयोजक बी.जी.शिंदे सचिव जनक्रांती डोंगरी विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अतनूर महाराष्ट्र राज्य उपस्थित राहणार आहेत. याचा लाभ अतनूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत २८ गावे, ६ उपक्रेंद्रातील गाव-वाडी-तांडा-वस्तीतील ३५ हजार नागरीकांनी घ्यावा. असे आवाहन सरपंच चंद्रशेखर पाटील, ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्याचे लातूर जिल्हा संघटक बालासाहेब शिंदे अतनूरकर, उपसरपंच बाबूराव कापसे, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष विकास सोमुसे-पाटील, रिपाईचे तालुकाध्यक्ष विनोद कांंबळे, सामाजिक कार्यकर्ते संभाजी पाटील, विजय पाटील, साहेबराव पाटील, दिलीप पाटील, उध्दव ठाकरे शिवसेनेचे जळकोट तालुकासंघटक मुक्तेश्वर येवरे-पाटील, महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगार व कर्मचारी काँग्रेसचे जळकोट तालुकाध्यक्ष कैलास सोमुसे-पाटील, माजी सरपंच दिलीप कोकणे, माजी सरपंच रमेश बोडेवार, काँग्रेस कमिटीचे जळकोट तालुका उपाध्यक्ष गोविंद कोकणे, भाजपाचे जळकोट तालुकाउपाध्यक्ष ईश्वर कुलकर्णी, माजी सैनिक ईस्माईलसाब मुंजेवार, आयुबसाब मुंजेवार, प्रभूराव गायकवाड, राहुल गायकवाड, प्रमोद संगेवार, विठ्ठल बारसुळे, गणेश गायकवाड, अविनाश शिंदे, युवासेनेचे गोविंद बारसुळे, सुदाम बाबर, श्रीकांत बोडेवार, रवि पांचाळ, धोंडीराम सोमुसे, विजयसिंह चव्हाण यांनी केले आहे.
