कासार सिरसी शहरात दर्पण दिनानिमित्त पत्रकारांचां विविध ठिकाणी सत्कार

कासार सिरसी शहरात दर्पण दिनानिमित्त पत्रकारांचां विविध ठिकाणी सत्कार

निलंगा (बालाजी मिलगिरे) : कासार सिरसी या शहरांमध्ये आद्य दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार दिनाच्या औचित्य साधून शहरातील व परिसरातील पत्रकारांचं विविध ठिकाणी सत्कार करण्यात आले.

प्रथमतः येथील विविध कार्यकारी सोसायटी, ग्रामपंचायत कार्यालय, करीबसवेश्वर महाविद्यालय, महात्मा बसवेश्वर फायनान्स व अन्य ठिकाणी सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी अनेकांनी मनोगत ही व्यक्त केले.

कासार सिरसी शहरात दर्पण दिनानिमित्त पत्रकारांचां विविध ठिकाणी सत्कार

यावेळी विकास सेवा सोसायटीचे चेअरमन शिवकुमार चिंचनसूरे, नवनिर्वाचित सरपंच सौ,मोनालीताई मडोळे, उपसरपंच बडेसाहेब लाकडहारे, शिक्षण संस्थेचे सचिव सुदर्शन,दादा चिंचनसूरे, उपाध्यक्ष गिरीश चिंचनसूरे, येथील पोलीस उपनिरीक्षक गजानन शिरसागर ग्रामविकास अधिकारी एच,डी, ढोले माजी सरपंच प्रदीप होळकुंदे सोसायटी संचालक विठ्ठलराव उजळंबे,दामू बंडगर, आशोक भोसले,बंडू सावळकर, कवी किशोर दिवसाळे, जय मल्हार क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष भास्कर पाटील शिवसेनेचे युवा नेते आझहर सावकार, ग्रामपंचायत सदस्य सतीश गुप्ता राजुअण्णा होळकुंदे,शिक्षक माळीसर, शहापुरेसर,दराडेसर, कर्मचारी इलाई, कमलाकर, गोपाळ, अन्यजण यावेळी मोठ्या संख्याने उपस्थितीत होते, या सर्वांचं पत्रकार संघाकडून आभार मानण्यात आले.

About The Author

error: Content is protected !!