अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या उदगीर शहराध्यक्षपदी प्रा.किरण गुट्टे यांची निवड

उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर शहरात अनेक महाविद्यालय आहेत, या महाविद्यालयापैकीच शिवाजी महाविद्यालय येथील विद्यार्थी प्रिय प्राध्यापक किरण गुट्टे यांच्या शैक्षणिक, सामाजिक कार्य पाहून त्यांची अखिल भारतीय विद्यार्थी परिषद उदगीर शहराध्यक्षपदी निवड झाली आहे.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या उदगीर शहराध्यक्षपदी प्रा.किरण गुट्टे यांची निवड

त्यांच्या या निवडीबद्दल व्ही .एन .के.नगरचे अध्यक्ष विजयजी राठोड, उपाध्यक्ष अरविंद धानुरे, प्रा. अनंत पाटील सचिव सुधाकररावजी मोहिते ,सहसचिव राजेंद्र सास्तुरकर, सुवर्णकार यांच्यासह सदस्य उदय कुलकर्णी, विजय जाधव, प्रशांत डोंगळीरकर, नारायण नागपमले, डॉ. आदिनाथ मरकड, डॉ.अजय कुलकर्णी, शुभम रायवाड, अनिरुद्ध रणसुभे,कमल पवार यांच्यासह व्ही. एन. के. नगर मधील इतरांनी त्यांचे अभिनंदन केले असून प्रा. किरण गुट्टे यांच्या या निवडीबद्दल शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.

About The Author

error: Content is protected !!