यशवंत विद्यालयाचे तब्बल 23 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक
अहमदपूर (गोविंद काळे) : माहे जुलै 2022 मध्ये घेण्यात आलेल्या पाचवी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेचे 6 विद्यार्थी आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती (आठवीचे) 17 विद्यार्थी ,असे एकूण 23 विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक ठरल्याने यशवंत विद्यालयाने आपल्या नेत्रदीपक यशाची परंपरा कायम ठेवली आहे. पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत ओम बैकरे 252 गुण घेऊन जिल्ह्यात अकरावा, वेदांत जुकुले 234 गुण घेऊन जिल्ह्यात 29 वा, सुयश गुणाले 228 गुण घेऊन जिल्ह्यात 37 वा, कुमारी अनघा मुर्के 226 गुण घेऊन 41 वी, कुमारी संपदा क्षीरसागर 206 गुण घेऊन जिल्ह्यात 37वी राहिले असून आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत कुमारी दीप्ती देशमुख 256 गुण घेऊन जिल्ह्यात नववी, प्रथमेश नागरगोजे 252 गुण घेऊन जिल्ह्यात तेरावा, विशाल केंद्रे 246 गुण घेऊन जिल्ह्यात सतरावा, श्रेयस पौळ 242 गुण घेऊन 22 वा, महेश सावरगावे 240 गुण,धनराज हंगरगे 236 गुण,साई नळेगावकर 236 गुण, ओमकार केंद्रे 234 गुण, विरेन मतलाकुठे 226गुण, आदिती यरमे 224गुण, आदित्य मुंडे 222 गुण, सायली भगत 216गुण, सृष्टी नागरगोजे 216 गुण, विश्वास फड 214 गुण, आर्यन कंदे 216 गुण, धनश्री साबळे 200 गुण,अपूर्वा कोरे 196गुण, घेऊन शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत.
या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे आठवी शिष्यवृत्ती विभागाचे प्रमुख गुरप्पा बावगे तसेच राजकुमार बोराळकर, सुदर्शन फुलमंटे ,सुडे हनमंत ,प्रतिभा सोलापुरे, मेघा देशमुख, गौरव चवंडा यांचे तर पाचवी शिष्यवृत्ती विभागाचे विभाग प्रमुख सहशिक्षक बापू कांबळे ,विजय वाडकर ,कमलाकर सुडे, एस एम झोळगीरकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले होते. या नेत्रदीपक यशाबद्दल टागोर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर अशोक सांगवीकर सचिव शिक्षण महर्षी डी बी लोहारे गुरुजी, मुख्याध्यापक व्ही.व्ही.गंपले,उपमुख्याध्यापक रमाकांत कोंडलवाडे, पर्यवेक्षक उमाकांत नरडेले, दिलीप गुळवे, राम तत्तापुरे, कोटा पॅटर्न चे प्रमुख एस एम शेख यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन आणि कौतुक केले आहे.
