विभागीय कथाकथन स्पर्धेत यशवंत विद्यालयाचे अपूर्वा वाघमारे सर्वप्रथम
अहमदपूर (गोविंद काळे) : अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला हेलस आणि मानस फाउंडेशन जालना यांच्या संयुक्त विद्यमाने सेलू जिल्हा परभणी च्या नूतन विद्यालयाच्या सभागृहामध्ये मराठवाडा स्तरीय विभागीय कथाकथन स्पर्धा होऊन त्यात मराठवाडा विभागात सर्वप्रथम येण्याचा मान यशवंत विद्यालय अहमदपूरच्या इयत्ता दहावी वर्गात शिकणाऱ्या अपूर्वा दत्ता वाघमारे या विद्यार्थिनीने मिळविलेला आहे. तिच्या नेत्रदीपक यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन आणि कौतुक करण्यात येत आहे. पंधराशे रुपये रोख, सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह देऊन कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. विनायक कोठेकर, प्रमुख अतिथी विचारवंत अमर हबीब, उपजिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे, नंदकिशोर बाहेती, प्रा. बसवराज कोरे, संयोजक कल्पनाताई हेलसकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या विद्यार्थिनींना मराठी विभाग प्रमुख राम तत्तापूरे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले होते. या यशाबद्दल टागोर शिक्षण समितीचे अध्यक्ष डॉ. अशोकराव सांगवीकर, सचिव शिक्षण महर्षी डी बी लोहारे गुरुजी, प्राचार्य व्ही व्ही गंपले, पर्यवेक्षक उमाकांत नरडेले, दिलीप गुळवे, सह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे.
