यशवंत विद्यालयाच्या दिव्यांका कदम हिला तलवारबाजी स्पर्धेत सुवर्णपदक

यशवंत विद्यालयाच्या दिव्यांका कदम हिला तलवारबाजी स्पर्धेत सुवर्णपदक

अहमदपूर (गोविंद काळे) : महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र ऑलिंपिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने औरंगाबादच्या विभागीय क्रीडा संकुल येथे ५ ते ८ जानेवारीच्या दरम्यान महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक स्पर्धेत तलवारबाजी खेळात यशवंत विद्यालयाची वर्ग नववीत शिक्षण घेणारी कुमारी दिव्यांका संतोष कदम हिला इप्पी प्रकारात सुवर्ण पदक मिळविल्याने तिचे सर्वच क्षेत्रातून अभिनंदन आणि कौतुक करण्यात येत आहे.
आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक स्पर्धेत भारतातील गुणवंत खेळाडू शोधण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या ही महत्वकांक्षी स्पर्धा असून त्यात विशेष म्हणजे ग्रामीण भागातून साधन सुविधेचा अभाव असताना अहमदपूरच्या मातीतील या खेळाडूने मोठे यश संपादन केले आहे.
या पूर्वी दिव्यांका कदमने दोन राष्ट्रीय पदके, दहा राज्यस्तरीय पदके हस्तगत केली आहेत. या क्रीडापटूंना शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते प्रा. दत्ता गलाले, संतोष कदम मोहसीन शेख , आकाश बनसोडे, वजरोद्दीन काजी , रोहित गलाले, दीपक हिंगणे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले होते.
क्रीडा क्षेत्रातील नेञदिपक यशा बद्दल टागोर शिक्षण समितीचे अध्यक्ष डॉ. अशोकराव सांगवीकर, सचिव शिक्षणमहर्षी डि.बी. लोहारे गुरुजी प्राचार्य व्ही.व्ही.गंपले, उपमुख्याध्यापक रमाकांत कोंडलवाडे, पर्यवेक्षक उमाकांत नरडेले, दिलीप गुळवे, राम तत्तापुरे, प्रा. अनिल चवळे यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

About The Author

error: Content is protected !!