स्वराज्य शिक्षक संघटनेच्या जिल्हा अध्यक्ष पदी सूर्यकांत नागरगोजे यांची निवड
अहमदपूर (गोविंद काळे) : परभणी जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असलेले शिक्षक सूर्यकांत शंकर नागरगोजे यांनी शिक्षक जिल्हांतर्गत बदलिमध्ये ग्रामविकास मंत्रालयात वेळोवेळी पाठपुरावा करून सन् 2022 ची बदली प्रक्रिया पार पडण्यास मोलाचे सहकार्य केले व अडचणीत सापडलेल्या शिक्षक बांधवाना बदली मिळवून देण्याच काम स्वराज्य शिक्षक संगठने ने केले या कार्याची दखल घेऊन राज्य अध्यक्ष गजानन पांचाळ, सदस्य अशोक कुटे व इतर पदाधिकारी यांनी परभणी जिल्हा अध्यक्ष पदी सूर्यकांत नागरगोजे यांची निवड केली यावेळी जी.प प्रा शा सायखेडा ता सोनपेठ जी .परभणी शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला ,या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक पवार सर, सहकारी अनंत कोते, नवनाथ घालगीळ, किशन मुंडे, तात्यासाहेब कुमठेकर सर्व शिक्षक वृंद उपस्तित होते या निवडीबद्दल जिल्ह्यातील सर्व शिक्षक बांधवातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
