महात्मा फुले महाविद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयात सांस्कृतिक विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने हिंदवी स्वराज्याच्या संकल्पक वीरमाता राजमाता जिजाऊ मॉसाहेब यांची व युवकांचे स्फूर्ती स्थान स्वामी विवेकानंद यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रोफेसर डॉ.अनिल मुंढे हे होते तर, इतिहासाचे गाढे अभ्यासक डॉ.संतोष पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ मॉसाहेब यांच्या व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजय मुरमुरे यांनी केले तर, आभार प्रा. प्रकाश गायकवाड यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
