आंतर महाविद्यालयीन नेटबॉल स्पर्धेत महात्मा फुले महाविद्यालय दुसऱ्या क्रमांकावर
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या मुलांच्या संघाने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडच्या अंतर महाविद्यालयीन नेटबॉल स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावून क्रीडा क्षेत्रातील आपला दबदबा कायम ठेवला.
याबाबतची सविस्तर वृत्त असे की, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या अंतर महाविद्यालय सेंटर झोन नेटबॉल स्पर्धा महात्मा गांधी महाविद्यालय अहमदपूर येथे नुकत्याच संपन्न झाल्या. या स्पर्धेत महात्मा फुले महाविद्याल याच्या मुलाच्या संघाने द्वितीय क्रमांक पटकावून यश संपादन केले. या संघामध्ये भालेराव स्वप्निल, कांबळे रोहन, बनसोडे अमोल, भालेराव अनिकेत, सोमवंशी ललित, श्रीरामे ज्ञानेश्वर, सावंत रोहन, शेख समीर, माने बुद्धभूषण या खेळाडू विद्यार्थ्यांचा समावेश होता. यांना क्रीडा संचालक प्रोफेसर डॉ. अभिजीत मोरे यांचे मार्गदर्शन लाभले.
यशस्वी खेळाडू व क्रीडा संचालक यांचे किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीरचे पदाधिकारी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील, उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थ्यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
