कै.रसिका महाविद्यालयात राजमाता जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी

कै.रसिका महाविद्यालयात राजमाता जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी

देवणी (प्रतिनिधी) : येथील उपक्रमशील महाविद्यालय म्हणुन ओळखले जाणारे कै. रसिका महाविद्यालय देवणी येथे राजमाता जिजाऊ माँसाहेब यांची व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. महेश मोरे यांच्या शुभहस्ते राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.

प्राचार्य डॉ. चंद्रकांत जावळे यांच्या शुभहस्ते स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!