अक्षरनंदन शाळेत राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

अक्षरनंदन शाळेत राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

उदगीर (एल.पी.उगीले) : येथील उपक्रमाशील अक्षरनंदन मराठी प्राथमिक व माध्यमिक शाळेत जिजामाता व स्वामी विवेकानंद जयंती उत्साह साजरात करण्यात आली. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून माध्यमिकेचे मुख्याध्यापक मारुती बिरादार होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून आनंद हालगरे व जाधव आदिनाथ उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजनाने झाली, व यावेळी जिजाऊ वंदना घेण्यात आली. तसेच सांस्कृतिक विभागातर्फे विद्यार्थ्यांची वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये जिजाऊ वेशभूषा व स्वामी विवेकानंद यांची वेशभूषा स्पर्धा झाली.

या स्पर्धेमध्ये श्रीधर शिवाजी भांडे, रोहित पाटील, देव पवार, प्रथमेश लोहारे, आरुष धावरे, लक्ष्मण गायकवाड यांची निवड स्वामी विवेकानंद वेशभूषेमध्ये करण्यात आली,त्याचबरोबर जिजामाता वेशभूषा मध्ये प्रांजल येगाडे, श्वेता मानसी पाटील, जानवी नीला, तोडकर, वैष्णवी, राधिका कवडेकर यांची निवड करण्यात आली. या वेशभूषा निवड समितीमध्ये सौ. मुळे , वाघमारे व ऐनापुरे यांनी काम पाहिले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तिगोटे उमाकांत यांनी केले तर आभार गोपाल कंदगुळे यांनी मांडले. याप्रसंगी मिथुन वाडीकर यांनी स्वामी विवेकानंद यांची माहिती विद्यार्थ्यांना दिली तर सौ. वाघमारे यांनी जिजामाता यांच्या बद्दलचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले. तसेच विद्यार्थ्यांनी देखील स्वामी विवेकानंद व राष्ट्रमाता जिजामाता यांच्या जीवनपटावर भाषणे केली. शाळेतील सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!