राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाचे उपजिल्हाधिकारी यांना निवेदन
उदगीर (एल.पी.उगीले) : राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभाग लातुर च्या वतीने उपजिल्हाधिकारी यांना बिहार प्रमाणे महाराष्ट्रातही ओबीसीची जातनिहाय स्वतंत्र जनगनणा करावी. या साठी निवेदन देण्यात आले. सध्या बिहार राज्यात ओबीसीची स्वतंत्र जातनिहाय जनगणना सुरु केली आहे.याही आगोदर तामिळनाडु,छत्तीसगड आणि इतर राज्यांनी सुध्दा आशा पद्धतीने जनगणना केली असून त्याचा राज्याच्या विकासासाठी उपयोग झाला आहे.
या प्रकारे महाराष्ट्रातही ओबीसीची स्वतंत्र जनगणना झाली तर महाराष्ट्राचा विकास करता येईल. या अपेक्षेने हे निवेदन देण्यात आले.या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उदगीर तालुका अध्यक्ष प्रा.शिवाजीराव मुळे ,ओबीसी जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण बतले, जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर पाटील ,ओबीसी तालुका अध्यक्ष जितेंद्र आड़े,प्रभाकर श्रीवास्तव,शोभाताई श्रीमंगले,सुधाकर दापकेकर,शिवाजी बुरले,मनोहर पांचाळ,वामन सुरनर,प्रवीण गडदे यांच्या सह अनेक कार्येकर्ते उपस्थित होते.
