ध्येय निश्चित करा यश नक्कीच मिळेल – शिल्पा गीते (इप्पर)

ध्येय निश्चित करा यश नक्कीच मिळेल - शिल्पा गीते (इप्पर)

अहमदपूर (गोविंद काळे ) : “स्पर्श” द एम्फटिक टच सेवभावी संस्था अंतर्गत ज्ञानदीप स्पर्धा परीक्षा अकॅडमी अहमदपूर येथे वनरक्षक व स्पर्धा परीक्षा विषयी मार्गदर्शन करताना शिल्पा गीते वण परिक्षत्र अधिकारी लातूर (इप्पर) म्हणाल्या की क्षेत्र कोणते ही असो धेय निश्चित केले की यश निश्चित मिळते. यशाचा शॉर्ट कट नसतो. वनरक्षक हे चलेंजिंग जॉब आहे मेहनत पण आहे आणि समाजसेवा पण आहे. ज्ञानदीप अकॅडमी मध्ये योग्य प्रकारे प्रशिक्षण दीले जाते तुम्ही जर सातत्य ठेवलात आणि मेहनत केलात तर यश नक्कीच मिळते. प्रास्ताविक मध्ये अकॅडमी चे संचालक उधव इप्पर म्हणाले आता पर्यंत अकॅडमी चे हजारों विद्यार्थी यशस्वी झाले आहेत त्यांपैकी बरेच वनरक्षक मध्ये पण सेवा करत आहेत. येणाऱ्या भरती साठी पण जोरात तयारी सुरू आहे. मोठ्या प्रमाणत यश मिळणार आहे. सूत्रसंचलन नितिन गुट्टे यांनी केले तर आभार महिला प्रशिक्षक अर्चना करपे यांनी केले . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राम मेजर, जितेंद्र मेजर, ऋतुजा बनकर यांनी केले.

About The Author

error: Content is protected !!