कुंभारवाडी ते खरोळा रस्ता संपूर्ण डांबरीकरण करण्याची मागणी
रेणापूर (प्रतिनिधी) : रेणापूर तालुक्यातील कुंभारवाडी ते खरोळा रस्ता गेल्या कित्येक वर्षपाहून अतिशय खराब झाला आहे. या रस्त्यावरती नव्याने काम झाले नसल्या कारणाने सदरील रस्ता पुर्ण पणे उघडला असून रस्त्यावर खड्यांची चाळण झाली आहे. कुंभारवाडी ते खरोळा हे अंतर 4.5 कि मी आहे. या रस्त्यावरून कुंभारवाडी सह सय्यदपुर धवेली ते कारेपूर येथील वाहतूक होते. मोठ्या प्रमाणात गावातील विद्याथी बाहेर गावी रोज शिक्षणासाठी जातात विद्यार्थी सह सामान्य नागरिकांना पण या रस्त्यावरून जाणे कठीण झाले आहे. पावसाळ्यात तर या रस्त्याला पुरांचे स्वरूप येत आहे. या मुळे वाहनांसह चालणे पण कठीण बनले आहे.
गत ऑक्टोबर महिन्यात मोठ्या प्रमाणात या भागात ढगफुटी व अतिवृष्टी झाल्याने सदरील रस्त्याचे आणखी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या रस्त्याला वारंवार मागणी करून पण या कडे दुर्लक्ष केले जात आहे. कुंभारवाडी ते खरोळा रस्त्यावरील शहाजी राऊतराव येथील पूल व कुंभारवाडी येथील कट्टा नदीला तर पुराचे स्वरूप आले होते या मुळे सदरील दोन्ही पुलांची उंची वाढवून नव्याने दोन्ही पुल होणे गरजेचे आहे. या कडे प्रशासन लक्ष देणार की नाही असा प्रश्न कुंभारवाडी ग्रामस्थासह या भागातील सर्व नागरिकांना पडला आहे. या संदर्भात लातूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना भेटून रस्त्याचे काम करणे संदर्भात कुंभारवाडी गावातील शेकडो ग्रामस्थांचे सही सह निवेदन रेणापूर तालुका विद्यार्थी काँग्रेस चे अध्यक्ष बाळासाहेब करमुडे यांनी दिले आहे.