आवर्तन 95 वी संगीत मासिक सभा पखावज पर्व लातूर येथे संपन्न
लातूर (प्रतिनिधी) : शास्त्रीय संगीतातील रसिक वर्ग तयार व्हावा व अभिजात शास्त्रीय संगीताचे संवर्धन व्हावे या उद्देशाने आवर्तन, अष्टविनायक प्रतिष्ठान व थोरमोठे पाटील मंगल कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मागील महिन्यांपासून सुरु असलेल्या आवर्तन मासिक संगीत सभेला आज 95 महिने पूर्ण झाले आहे . त्यानिमित्ताने आवर्तन 95 वी संगीत मासिक सभा पखावज पर्व थोरमोटे मंगल कार्यालय येथे पार पडली. या मासिक संगीत सभेमध्ये दिल्ली येथील प्रसिद्ध पखावज वादक संगीत मार्तंड – ताल शिरोमणी पं. डालचंद शर्मा यांनी स्वतंत्र पखावज वादन केले. यासाठी संगीत प्रेमींनी मोठी गर्दी केली होती. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून करण्यात आली. त्यानंतर पं. डालचंद शर्मा यांचे शिष्य प्रा. गोपाळराव जाधव यांनी पं. डालचंद शर्मा यांचे शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन स्वागत केले. त्यांनंतर प्रसिद्ध जेष्ठ पखवाज वादक पं.डालचंद शर्मा यांनी मृदंग वाद्याची माहिती सांगून सादरीकरण करण्यास प्रारंभ केला त्यांना संवादिनी साथ संगत दिनेश डोळे, औरंगाबाद यांनी केली. धमार व चौताल मध्ये स्वतंत्र पखावज वादन करणार आले त्यातून करण्यात आलेल्या विविध लयकारीमुळे आणि नवनवीन प्रकारामुळे श्रोतावर्ग मंत्रमुग्ध झाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.पाटील मॅडम , प्रास्ताविक प्रा. जोशी सर व आभार प्रा. मृदंगाचार्य प्रा. गोपाळराव जाधव यांनी मांडले.
मुळातच संगीताची व्याख्या गायन वादन व नृत्य असल्यामुळे या तीनही कलेंचे संवर्धन व्हावे व विविध कला प्रकारांचा रसिकांना आस्वाद घेता यावा यासाठी आवर्तन , अष्टविनायक प्रतिष्ठान व थोरमोटे पाटील मंगल कार्यालय लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने संगीत मासिक सभेचे आयोजन करण्यात आले होते. संगीत शिकणा-या नवीन संगीत साधकांना या कलाप्रकारांची जवळून ओळख व्हावी नवनवीन वाद्ये त्यांना जवळून पाहता यावीत ऐकता यावीत व त्यांच्या स्वत:च्या संगीत साधने मध्ये याचा उपयोग व्हावा या हेतूने विविध वाद्य विविध नृत्य प्रकार गायनातील व वादनातील ख्याल गायन तसेच धृपद धमार गायन वादन इत्यादी कलाप्रकार या आवर्तन मासिक संगीत सभेमध्ये सादर झाले आहेत व रसिकांनी याचा आनंद घेतला.