ज्ञानदीप स्पर्धा परीक्षा अकॅडमी, अहमदपूर येथे केले 52 जणांनी रक्तदान

ज्ञानदीप स्पर्धा परीक्षा अकॅडमी, अहमदपूर येथे केले 52 जणांनी रक्तदान

अहमदपूर (गोविंद काळे) : “स्पर्श” The Emphatic Touch सेवा भावी संस्था अंतर्गत ज्ञानदीप स्पर्धा परीक्षा अकॅडमी अहमदपूर येथे राष्ट्रमाता मा जिजाऊ, स्वामी विवकानंद, युवक दीन व कै. माधव ज्ञानोबा इप्पर यांच्या जयंती निमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. उदघाटन महाराष्ट्र राज्याचे माजी राज्य मंत्री बाळासाहेब जाधव यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अहमदपूर चाकूर विधानसभा चे माजी आमदार बब्रुवान खंदाडे होते. प्रमुख उपस्थिती ज्ञानोबा इप्पर (बाबा) डॉ.गजानन माने, डॉ. विशाखा घोडके, डॉ. एम. आय.चोधरी, प्रा.जनार्धन भालेराव, राम प्रसाद आयर, लक्ष्मण अलगुले, अंकुश इप्पर (चेरमान नागझरी), बालाजी नागरगोजे, सावन कदम, पांचाळ मेजर, व्यंकट इप्पर, प्रलद इप्पर, श्याम सुर्यवंशी आदी उपस्थित होते. प्रास्ताविक मध्ये ज्ञानदीप अकॅडमी चे संचालक श्री उद्धव इप्पर म्हणाले की अकॅडमी मध्ये सर्व भरत्यांच प्रशिक्षण दिले जाते त्याबरोबच माणुसकीचे व समाजकार्याची पण शिक्षण दिले जाते. आतापर्यंत 1000 पेक्षा जास्त बॉटल वेगवेगळ्या रक्त पेड्याना रक्तदान केले आहे. DIG मंचक इप्पर IPS यांचे समाजकार्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन असते. उद्घाटक बाळासाहेब जाधव म्हणाले कि रक्तदाना मुळे जीवदान तर मिळतेच पण स्वतः चे आरोग्य ही चांगले राहते आणि त्याचे महत्व सांगून स्पर्धा परिक्षेविषयी माहिती दिली. तुम्ही या ज्ञानदीप अकॅडमी वर आलात यशस्वी तर व्हालच पन या यशबरोबरच तुम्ही एक जबाबदार नागरिक बना तरच हा देश महासत्ता होईल असा मोलाचा सल्ला दिला.

अध्यक्षीय भाषणात खंदाडे साहेब म्हणाले की रक्तदान हे सर्व सर्वश्रेष्ठ दान आहे आपण सर्वांनी करून देशसेवा करावी हि अकॅडमी आता पर्येंत हजारो विद्यार्थ्यांना सरकारी नोकरी दिली आहेत ते पण फक्त माफक फीस मध्ये. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अकॅडमी चे प्रशासकीय अधिकारी चीमनराव कावळे यांनी केले तर आभार प्रा. अमोल वाघमारे यांनी मानले. कार्यक्रम येशवसिरित्या पार पाडण्यासाठी प्रशासकीय अधिकारी नितिन गुट्टे, ग्राउंड प्रशिक्षक राम मेजर,जितेंद्र मेजर, प्रा.राहुल ढवळे, प्रा. संदीप मुसळे, महीला प्रशिक्षक ऋतुजा बनकर, अर्चना करपे, निखिल कोळी यांनी सहकार्य केले. विशेष म्हणजे मुलाबरोबर मुलींनी सुधा रक्तदान केले.

About The Author