प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत रस्ते कामासाठी ६७७.०९ लक्ष रुपयांच्या निधीची तरतूद – आ. बाबासाहेब पाटील यांची माहिती!
अहमदपूर (गोविंद काळे) : अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबासाहेब पाटील यांच्या प्रयत्नांतून आणि खासदार सुधाकरजी शृंगारे यांच्या सहकार्यामुळे शिरूर ता. आंबेगाव, बोडका, सय्यदपूर रस्ते कामास प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत मंजुरी देण्यात आली आहे. याबाबत आ. बाबासाहेब पाटील यांनी माहिती देत केंद्र शासनाचे आभार व्यक्त केले. जवळपास ७.१ किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी सुमारे ६७७.०९ लक्ष रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्याला मंजुरी मिळाल्यामुळे हे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे, अशी माहिती आ. पाटील यांनी दिली.
मतदारसंघाच्या दृष्टीने महत्त्वाचा असणारा शिरूर ता. आंबेगाव, बोडका, सय्यदपूर रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. आमदार बाबासाहेब पाटील यांच्या कार्यकाळात मतदारसंघात अनेक विकासकामे होत आहेत. वारंवार केलेल्या पाठपुराव्याला यश तसेच सम्यक दृष्टिकोनातून मतदारसंघाचा कायापालट करण्यात ते यशस्वी झाल्याचे यातून दिसते. अनेक वर्षांची रखडलेली कामे आमदार बाबासाहेब पाटील यांच्या कार्यकाळात पूर्णत्वास जात आहे. याबाबत मतदारसंघातील जनता समाधानी आहे.