प्राचार्य डॉ. वसंत बिरादार यांना कै. दुर्गादास सराफ प्रतिष्ठानचा लोकमान्य टिळक पत्रकारिता पुरस्कार जाहीर
अहमदपूर (गोविंद काळे) : हिंदवी बाणा लाईव्ह च्या वर्धापन दिनाच्या औचित्य साधून कै. दुर्गादास सराफ पत्रकार प्रतिष्ठानच्या वतीने मागील चार वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पत्रकारांना दिला जातो सन २०२२ चा लोकमान्य टिळक पत्रकारिता पुरस्कार अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य तथा ज्येष्ठ पत्रकार डॉ.वसंत बिरादार पाटील यांना नुकताच जाहीर करण्यात आला.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील हे मराठी साहित्याचे ज्येष्ठ समीक्षक, ललित लेखक तथा निर्भीड ,नितळ व सव्यसाची पत्रकार म्हणून सर्व परिचित आहेत. मागील तीस वर्षापासून ‘लोकमत’चे पत्रकार म्हणून तर ‘दैनिक वतनवाला’ चे सल्लागार म्हणून उत्कृष्ट कार्य केले आहे. या पूर्वी त्यांना पां.वा.गाडगीळ या सह इतर अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांच्या सवंग कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य प्रेस मीडिया च्या सल्लागारपदी नुकतीच प्राचार्य डॉ.बिरादार यांची निवड झाली. आता वसंत बिरादार यांच्या शोधपत्रकारिता, स्तंभलेखन, विविध वार्ता पत्रासह पत्रिकारिता क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन कै. दुर्गादास सराफ पत्रकार प्रतिष्ठान, कंधार व हिंदवी बाणा लाईव्ह यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांना मान्यवरांच्या हस्ते लोकमान्य टिळक पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
पत्रकारिता क्षेत्रातील महत्त्वाचा समजला जाणारा लोकमान्य टिळक पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीर शचे पदाधिकारी ज्ञानदेव झोडगे, पी. टी. शिंदे, संस्कृत साहित्याचे गाढे अभ्यासक प्रा.डॉ. राजेंद्र शास्त्री आर्य, प्रा. डॉ. पराग जोशी, हानेगाव येथील कै. बापूसाहेब पाटील एकंबेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंचशील एकंबेकर तसेच महात्मा फुले महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी तसेच महाविद्यालयांतील प्राध्यापक कार्यालयीन कर्मचारी आदींनी सत्कार करून अभिनंदन केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.