शास्त्री प्राथमिक शाळेत मकरसंक्रांतीनिमित्त कार्यक्रम संपन्न.
उदगीर (एल. पी. उगीले) : येथील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था,अंबाजोगाई संचलित लालबहादुर शास्त्री प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना मकरसंक्रांत सणाचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे,तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून सौ.श्रीदेवी कबाडे उपस्थित होत्या.तसेच व्यासपीठावर विभाग प्रमुख सुधाकर पोलावार व बालवाडी प्रमुख सौ.छायाताई कुलकर्णी यांची उपस्थिती होती. पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले.सर्व पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शिका श्रीदेवी कबाडे यांनी हिंदू धर्मातील प्रत्येक सणातून विशेष संस्कार होतात.प्रत्येक सणातून एकोपा,आपुलकीची भावना वाढण्यास मदत होते.यातूनच राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागते.मकरसंक्रांती सणाचे महत्त्व सविस्तराने विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. सर्वांना मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या.
अध्यक्षीय समारोपपर भाषणात मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे यांनी मकरसंक्रांती दिवशी ‘तिळगूळ घ्या, गोड गोड बोला’असे म्हणतात.सध्या हिवाळ्याचे म्हणजेच थंडीचे दिवस आहेत.तिळात स्निग्धता व गुळात उष्णता असते.त्यामुळे तिळगुळ वाटप करतात.असे सांगितले व सर्वांना मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या.
सुत्रसंचलन व आभार श्रीमती निताताई वट्टमवारबाईंनी केले.सर्व विद्यार्थ्यांना तिळगुळ वाटप करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.