पृथ्वीचा भौगोलिक विनाश नाही थांबवल्यास सृष्टीचा नाश होईल – रोहित बिराजदार

पृथ्वीचा भौगोलिक विनाश नाही थांबवल्यास सृष्टीचा नाश होईल - रोहित बिराजदार

उदगीर (एल.पी.उगीले) : माणूस वृक्षतोड करून डोंगर-दऱ्या खोदून, नदीतील वाळू उपसून पृथ्वीचा नाश करीत आहे.त्यामुळे भूकंप, चक्रीवादळ, भूस्खलन अशि संकटे मोठ्या प्रमाणात होत आहेत.हा विनाश थांबवला, तरच जीवसृष्टी वाचेल. असे प्रतिपादन आदर्श शिक्षक रोहित बिराजदार यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, शाखा उदगीर व डॉ.राधाकृष्णन प्राथमिक विद्यालय, उदगीर तर्फे भूगोल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते पुढे म्हणाले की, चंद्रग्रहण, सूर्यग्रहण या खगोलीय घटना आहेत, यांचा कुठलाही परिणाम मानवी जीवनावर होत नाही.

कार्यक्रमाची सुरुवात डॉ. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली.या कार्यक्रमात उपस्थित मान्यवर पाहुण्यांचे शाल, श्रीफळने स्वागत न करता , भारतीय संविधानाची संक्षिप्त प्रत व तिळगुळ देऊन करण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अं. नि. स. शाखा उदगीर चे प्रधान सचिव ॲड. महेश मळगे यांनी मकर संक्रांत सणाची माहिती दिली, व महत्त्व सांगितले.उद्याची चांगली पिढी निर्माण करण्यासाठी असे कार्यक्रम प्रत्येक शाळेत घ्यावेत, असे सांगितले . राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक विश्वनाथराव मुडपे गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अं.नि.स.शाखा-उदगीरचे उपाध्यक्ष बाबुराव माशाळकर यांनी केले. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून अं. नि. स. शाखा उदगीरचे कार्याध्यक्ष धोंडीराम राठोड, जिव्हाळा ग्रुपचे विश्वनाथराव बिरादार, शिवमुर्ती भातांब्रे, दशरथराव शिंदे, चंद्रकांतराव रोडगे, मु. अ. ज्ञानोबा गुंडगिरे यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षाताई पाटील यांनी केले, तर आभार प्रशांत पांचाळ यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक शशिकुमार पाटील, विठ्ठल नादरगे, श्रीमती प्रफुलता बोडके यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी विद्यार्थी व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

About The Author