वाढवणा जिल्हा परिषद शाळेत नवीन वर्ष सुरु झाल्या पासुन पोषण आहार गायब
वाढवणा बु (हुकूमत शेख) : वाढवणा बुद्रुक येथील जिल्हा परिषद कन्या प्रशाळेतील 16दिवस झाले तांदुळ संपल्यामुळे नवीन वर्षापासून शालेय पोषण आहार योजना बंद असल्यामुळे गोरगरीब विध्यार्थिनींना प्रशासनाच्या गलथानपणा मुळे त्रास सहन करावा लागत आहे.
एकीकडे शासन मुलींच्या शिक्षणाला प्राधान्य देत सर्व शिक्षण मोफत दिले जात असुन पहीली ते आठवी पर्यंतच्या मुला मुलींना शाळेत दुपारी पोषण आहार (खिचडी )दिली जाते. मात्र नवीन वर्ष सुखाचे जाओ, म्हणुन सर्वांनी प्रार्थना केली. मात्र इथे तर नवीन वर्ष 2023 सुरु होऊन 16 दिवस झाले तरी कन्या शाळेला संबंधित प्रशासनाने नवीन वर्षांच्या सुरवातीलाच मुला मुलींना उपाशी ठेवण्याचा विडा उचलला आहे का? असा प्रश्न पालक वर्गातून व्यक्त होत आहे. एकीकडे 14 वर्ष वयोगटातील मुलांना,मुलींना सक्तीचे शिक्षण देण्याचा कायदा केला. मात्र दुपारचे जेवण देण्यासाठी शाळेत तांदुळचा पुरवठा करत नाहीत.याचे आश्चर्य वाटतं आहे. ग्रामीण भागात एक तरी काम मिळत नसल्यामुळे मुला मुलींना शिक्षण देण्याकरिता वह्या, पेना घेण्यासाठी पैसा वेळेवर मिळत नाही, म्हणुन पालक चिंतेत असतात. मात्र शासनाने शालेय पोषण आहार (खिचडी) शाळेत चालु केल्या मुळे पालकांना तेवढाच आधार व समाधान वाटतं होते. मात्र नवीन वर्ष सुरु झाल्या पासुन जिल्हा परिषद कन्या शालेत प्रशासनाने तांदुळ पुरवठा केला नाही. या मुळे मुलींना शाळेत भोजन मिळत नसल्यामुळे उगीच त्रास सहन करावे लागत असुन संबंधित खात्याने जातीने लक्ष घालुन लवकरात लवकर तांदुळ पुरवठा करून ग्रामीण भागातील शाळेतील विध्यार्थिनींना शालेय पोषण आहार (भोजन) मिळण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी पालक वर्गातून होत आहे.